शिक्षकांना आहे तिथेच ठेवा, सक्ती नको

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

कोरोनाविषयी २० एप्रिलच्या आपल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने शिक्षक परिषदेने  नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना कोविन गार्ड म्हणून काम करण्याचे  आवाहन केले आहे. स्वतः सर्व सुदृढ व निरोगी पदाधिकारी यांनी आपल्याकडे माहिती सादर केली आहे.

नंदुरबार : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून शिक्षकांना होणाऱ्या पोषण आहार वाटप कामाच्या सक्तीमुळेच अक्कलकुवा येथे कोरोनाने शिरकाव केल्याचे दिसून येत आहे. यापुढे शिक्षक आहे, तिथेच त्याला काम सोपवावे, जेणेकरून त्याचा इतरांशी संपर्क येणार नाही असे निवेदन महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या जिल्हा शाखेच्या नंदुरबार प्राथमिक विभागामार्फत जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासनाला करण्यात आली आहे.

निवेदनात म्हटले आहे की कोरोनाविषयी २० एप्रिलच्या आपल्या मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने शिक्षक परिषदेने  नंदुरबार जिल्ह्यातील सर्व शिक्षक बांधवांना कोविन गार्ड म्हणून काम करण्याचे  आवाहन केले आहे. स्वतः सर्व सुदृढ व निरोगी पदाधिकारी यांनी आपल्याकडे माहिती सादर केली आहे. आपल्या आदेशान्वये कोणीही जिल्हा सोडू नये असे असतानाही लॉक डाऊन पूर्वी जे शिक्षक बांधव  होळीच्या सुटीमुळे किंवा कौटुंबिक कारणासाठी आपल्या मूळ गावी गेलेले आहेत अथवा नंदुरबार जिल्ह्या पासून बाहेरगावी अडकलेले आहेत अश्या शिक्षकना आपल्या आदेशानुसार नंदुरबार जिल्ह्यात प्रवेशास बंदी केली होती. असे असताना जिल्हा परिषद प्रशासन विशेषतः शिक्षण विभाग जिल्हा परिषद शिक्षक बांधवांवर विविध कामाच्या माध्यमातून सक्ती करीत असल्याचे परिषदेच्या लक्षात आले आहे। सद्यपरिस्थितीत बहुतांशी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षक शहरी भागात वास्तव्य करीत आहे त्यांना त्यांच्या शाळेच्या गावात स्वस्त धान्य दुकान वाटप केंद्रावर जाऊन निरीक्षणाचे  काम किंवा शाळेत जाऊन विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार वाटप  आदी बाबत सक्ती केली जात आहे. याबाबत शिक्षक परिषदेने जिल्हा अधीक्षक शालेय पोषण आहार व जिल्हा शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना यांच्या होणाऱ्या दूरगामी  दुष्परिणामांची कल्पना दिली होती. तरीही शिक्षण विभाग ,शालेय पोषण आहार जिल्हा अधीक्षक व तळोदा तालुका शिक्षण विभाग व तालुका शालेय पोषणआहार विभागाने शालेय पोषण आहार वाटप शक्तीची केल्याने तळोदा शहरातील उर्दू शाळेच्या शिक्षक दांपत्य हे मालेगावहुन फक्त शालेय पोषण आहार वाटप करण्यासाठी आले होते. सदर  शिक्षक दांपत्य हे  मूळ गावी मालेगावात  संचारबंदी काळात वास्तव्यास होते, परंतु शालेय पोषण आहार वाटपाची  सक्ती केल्याने सदर  शिक्षिका दाम्पत्य अक्कलकुवा येथे मुख्यालय आले. मुख्यालयी आल्यानंतर  दोन दिवसांनी  ते कोरोना बाधित असून ते कोरोनाचे   वाहक सुद्धा झाल्याचे त्यांच्या तपासणीनंतर लक्षात आले परंतु त्यास उशीर झाला होता.
या शिक्षिकेवर जिल्हा आरोग्य विभागामार्फत उपचार सुरू आहे, तरी शिक्षक बांधवांवर सुद्धा सद्य स्थितीत ते जिथे वास्तव्य करीत असतील त्यांना  तितेच वास्तव्य करन्याबाबत सूचना करून  जिल्ह्याबाहेर गेलेल्या कर्मचाऱ्यांना  नंदुरबार जिल्ह्यात प्रवेश देऊ नये किंवा  कोणत्याही कामासाठी त्यांना जिल्ह्यात येणाची सक्ती करू नये. शिक्षक बांधवांचा  शहरी भागातून ग्रामीण भागात प्रवास होणार नाही किंवा ग्रामीण जनतेच्या संपर्कात जाणार नाही याकरिता आपल्या स्तरावरून योग्य ती कार्यवाही होऊन जिल्हा परिषद शिक्षण विभाग यांना आपण आदेशीत करावे. कोविड १९ म्हणून  आपत्कालीन परिस्थितीत कामास पाठवायचे आहे त्यांची स्क्रीनिग करूनच पाठवावे, याबाबत  शिक्षक संघटना म्हणून आम्हालाही मार्गदर्शन प्राप्त व्हावे  अशी मागणी जिल्हाकार्यवाह पुरुषोत्तम काळे, राज्य कार्यवाह आबा बच्छाव, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी यांनी केली आहे.
-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar teacher asosiasion nivedan poshan aahar