
गणपती, नवरात्रोत्सव गेले तरी कोरोना महामारीमुळे बंद केलेले मंदिर उघडले नाही. यामुळे अनेकांचे मानलेले साकडे फेडण्यासाठी किंवा देवाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना आस लागली होती. अखेर आठ महिन्यानंतर मंदिर उघडण्याचा निर्णय शासनाने घेतला आणि मंदिर दर्शनार्थ खुले करण्यात आले. परंतु मंदिर उघडताच संकटमोचक मारूतीरायाला पहिले साकडे घालण्यात आले.
नंदुरबार : गेली आठ मास महाराष्ट्रात कोरोना महामारीमुळे देऊळ बंद होते. समस्त हिंदुत्ववादी संघटना यांनी सातत्याने मंदिर उघडण्यासाठी केलेली मागणी अखेर महाराष्ट्र शासनाने मान्य केली. आज दिपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदिरे उघडण्यात आली आहे. मंदिर उघडल्यानंतर महाआरती करून देवाला समितीने साकडे घातले.
मंदिर उघडण्याचा आनंद साऱ्याच भाविकांना झाला आहे. हा आनंद साजरा करण्यासाठी देवाचा चरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री मोठा मारुती मंदिर येथे हिंदु सेवा सहाय्य समितीचावतीने महाआरती करण्यात आली. तसेच जागतिक कोरोना महामारी नष्ट होऊ दे असे साकडे देवाला घातले. यावेळी भाविक भक्त यांनी कोरोनाचे सर्व नियम पाळून उपस्थित होते.
मंदिराचे पुजारी महाआरतीला
महाआरतीला मोठा मारुती मंदिराचे अध्यक्ष अशोक चौधरी, सचिव कल्याण पाटील, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, स्वदेशी बचाव आंदोलनाचे कपिल चौधरी, स्वयंसेवक भरत लोहार, हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील, मयुर चौधरी, जितेंद्र राजपूत, सुमित परदेशी, जितेंद्र मराठे, हिंदुत्ववादी, भाविक यावेळी उपस्थित होते. महाआरती उपस्थित भाविक तसेच मोठा मारुती मंदिराचे पुजारी विलास महाराज यांचा शुभहस्ते झाली.
संपादन ः राजेश सोनवणे