केंद्रीय मंत्री जावडेकरांनी नंदुरबार जिल्ह्याचा घेतला आढावा 

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 14 April 2020

जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यावेळी श्री. चौधरी यांनी जिल्ह्यातील प्रशासनाने केलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य यंत्रणेची तयारी, गरीबांना धान्य वाटप, रेशन, मदत कार्य, शिधा वाटप, जेवण पुरवठा तसेच पक्षातर्फे केले जाणारे मदत कार्य याबाबतचा सविस्तर माहिती दिली.

नंदुरबार :  जिल्ह्यात कोरोनाचा एकही रूग्ण नाही, शेतकरी व मजूर वर्गावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यातील काही व्यवहार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे आज केली. मंत्री श्री. जावडेकर यांनी दुरध्वनीवरून नंदुरबार जिल्ह्यातील कोरोना विषाणू संसर्गाबाबत परिस्थितीचा आढावा श्री. चौधरी यांच्याकडून आज जाणून घेतला. 

नंदुरबार जिल्हा हा तीन राज्यांच्या सीमेवर आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याकडे सर्वांचेच लक्ष आहे. मंत्री जावडेकर यांनी आज दुपारी श्री. चौधरी यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क करून जिल्ह्याचा आढावा घेतला. त्यावेळी श्री. चौधरी यांनी जिल्ह्यातील प्रशासनाने केलेले प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य यंत्रणेची तयारी, गरीबांना धान्य वाटप, रेशन, मदत कार्य, शिधा वाटप, जेवण पुरवठा तसेच पक्षातर्फे केले जाणारे मदत कार्य याबाबतचा सविस्तर माहिती दिली. जिल्ह्याची परिस्थीबाबत मंत्री जावडेकर यांनी समाधान व्यक्त केले. 

चौधरींनी मांडली जिल्ह्याची व्यथा 
श्री. चौधरी यांनी जिल्ह्यात एकही रूग्ण नाही, परिस्थिती नियंत्रणात आहे. प्रशासन सज्ज आहे. मात्र जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे टरबूज, केळी सारखे पिके शेतात सडताहेत. व्यवहार ठप्प झाल्याने कोणीही ते घेण्यास तयार नाही. बांधकाम, हॉटेल व्यवसायावर जगणारे व सर्वसामान्य मजूर वर्ग यांचे सारे काही ठप्प झाले आहे. त्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात व्यवहार सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय व्हावा, अशी मागणी केली. त्यावर याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापर्यंत माहिती पोहचवून जिल्ह्याचा व्यवहार लवकरात लवकर कसा सुरू होईल याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन मंत्री जावडेकर यांनी श्री. चौधरी यांच्याशी बोलतांना सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nandurbar Union Minister Javadekar reviews Nandurbar district