नंदुरबार,नवापूरात बेमोसमी पाऊस

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 26 March 2020

उन्हाळ्याचा चटक्यांऐवजी शहरातील नागरिकांना गारठा अनुभवयास मिळाला.या बेमोसमी पावसाचा मात्र शेतकऱ्यांचा गहू, हरभरा पिकांना फटका बसणार आहे.

नंदुरबार : शहरात दुपारी चारच्या सुमारास वातावरणात बदल होऊन शहरातील काही भागात पावसाचा तुरळक सरी कोसळल्या. त्यामुळे मिरची पथारी व्यापाऱ्यांची धावपळ उडाली होती.

नवापूरात जोरदार पाऊस
आज दुपारी दोनला अचानक वातावरणात बदल होऊन ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. दहा मिनिटे पडलेल्या या बेमोसमी पावसाने साऱ्यांचीच झोप उडविली. शेतकऱ्यांचा पिकांना मात्र धोका आहे.

काल (ता.२४) दुपारी पावसाळी वातावरण तयार झाले होते,नंतर ते निवडले होते. आज दुपारी दोनला बेमोसमी पाऊस झाला.सुमारे दहा मिनिटे झालेल्या या पावसाने शहर जलमय केले होते. उन्हाळ्याचा चटक्यांऐवजी शहरातील नागरिकांना गारठा अनुभवयास मिळाला.या बेमोसमी पावसाचा मात्र शेतकऱ्यांचा गहू, हरभरा पिकांना फटका बसणार आहे. ही पिके काढणीला आले आहेत. ते पावसाचा सापडून नुकसान होण्याची भिती आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nandurbar Unseasonal rain in Nandurbar, Navapur