esakal | युरियासाठी शेतकरी परराज्यात; पण तिथेही आधारकार्डची समस्‍या
sakal

बोलून बातमी शोधा

urea

पावसाळा सुरू झाल्‍यानंतर पिकांना खताचा पहिला डोस देण्याची वेळ आली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना युरिया मुबलक प्रमाणात उपलब्‍ध होत नसल्‍याचे चित्र सर्वत्र आहे. यावर्षी युरिया खताच्या तुटवडा सुरुवातीपासून होऊ लागला आहे.

युरियासाठी शेतकरी परराज्यात; पण तिथेही आधारकार्डची समस्‍या

sakal_logo
By
विजय वळवी

धानोरा (ता. नंदुरबार) ः निम्‍मे पावसाळा संपण्यावर आला आहे. अशात यंदा सुरवातीपासून पिकांना खत देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी युरियाचा तुटवडा राहिला आहे. हा तुटवडा अजून देखील भरून निघलेला नाही. यामुळेच परिसरातील नागरिकांना युरिया खत मिळत नसल्याने शेजारील गुजरात राज्यातून युरिया खत घेण्यासाठी जावे लागत आहे. 

पावसाळा सुरू झाल्‍यानंतर पिकांना खताचा पहिला डोस देण्याची वेळ आली होती. तेव्हापासून शेतकऱ्यांना युरिया मुबलक प्रमाणात उपलब्‍ध होत नसल्‍याचे चित्र सर्वत्र आहे. यावर्षी युरिया खताच्या तुटवडा सुरुवातीपासून होऊ लागला आहे. मध्यंतरीच्या काळात युरिया खते उपलब्ध झाली; तेव्हा शेतकऱ्यांनी ती घेतली. पण त्यांना जेवढा स्टॉक लागतो तो त्यांना मिळाला नाही. आता दुसऱ्यांदा पिकांना खताचा डोस देण्यासाठी शेतकऱ्याला युरिया खत भेटत नाही. 

तिथे आधारकार्डची समस्‍या
युरिया मिळत नसल्‍याने शेतकरी शेजारच्या गुजरात राज्यात खत घेण्यासाठी जात आहे. पण तिथे आधार कार्डची समस्‍या निर्माण होत आहे. दुसऱ्या राज्याचे आधार कार्ड असल्याने त्यांना तिथे पण युरिया खत मिळत नाही. संततधार पावसाने पिकांची वाढ खुंटली आहे. पिके वाढीसाठी शेतकऱ्याला युरिया खताची अत्यंत गरज आहे. पण त्याला युरिया खत भेटत नसल्याने तो पीक वाचविण्यासाठी दारोदारी फिरत आहे. कृषी विभागाने जो युरिया खताच्या पुरवठा केला आहे. तो खरोखरच शेतकऱ्यांना मिळाला का? याची चौकशी होणे गरजेचे आहे. या परिसरात काही खाजगी कृषी खते विक्रेत्यांची दुकाने आहे. त्यांच्याकडे युरिया सोडून दुसरे खत मिळते व युरिया सुरुवातीपासून आजपर्यंत उपलब्ध का नाही झाले? याची चौकशी कृषी विभागाने करावी अशी या परिसरातील शेतकऱ्यांची मागणी आहे.

संपादन : राजेश सोनवणे

loading image
go to top