esakal | शेती सातबाऱ्यासह घराच्‍या उताऱ्यावर आता पतीसोबत पत्नीचेही असणार नाव 

बोलून बातमी शोधा

शेती सातबाऱ्यासह घराच्‍या उताऱ्यावर आता पतीसोबत पत्नीचेही असणार नाव }

जागतिक महिला दिन म्हणजे ८ मार्चपासून अंमलबजावणी केली जाणार आहे.

शेती सातबाऱ्यासह घराच्‍या उताऱ्यावर आता पतीसोबत पत्नीचेही असणार नाव 
sakal_logo
By
धनराज माळी

नंदुरबार : राज्यातील ग्रामीण भागातील महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी ग्रामविकास विभागामार्फत जागतिक महिला दिनापासून (८ मार्च) महासमृद्धी महिला सक्षमीकरण अभियान राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत अनेक बदल पाहायला मिळतील, त्यात शेतीच्या सातबाऱ्यासह घराच्या उताऱ्यावर पतीसोबत पत्नीचेही नाव लावले जाणार आहे. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी या संदर्भात ग्रामविकास विभागाने निर्णय घेतला असल्याची माहिती नुकतीच दिली होती. 

आवश्य वाचा- प्राथमिक शाळांच्या ओपनिंगवर पुन्हा प्रश्नचिन्ह 
.

महिलांना आत्मनिर्भर करून त्यांना पुरुषांबरोबर समान न्याय देण्याचा प्रयत्न शासनाचा आहे. त्यामुळे महिलांना बचतगटाच्या माध्यमातून विविध उद्योग, व्यवसाय, कौशल्य विकासासह आर्थिक व सामाजिक, शैक्षणिक सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यासाठी राज्याच्या ग्रामविकास विभागाने विशेष भर दिला आहे. त्यामुळे शासन आता महिलांच्या आत्मसन्मानवाढीसाठी शेतजमिनीवर म्हणजे ७/१२ उताऱ्यावर पतीसोबत आता पत्नीचे नाव लावणे, तसेच घर दोघांचे योजनेंतर्गत नमुना क्रमांक ८ वरही पतीसोबत पत्नीचे नाव लावण्यात येणार आहे. म्हणजे याअंतर्गत मालमत्तेवर पती व पत्नीचे नाव लावणे, मशेरीमुक्ती, तपकीरमुक्ती आदींबाबत जनजागृती करणे, महिलांचे उपजीविकेचे स्रोत वाढविणे, महिलांना पायाभूत प्रशिक्षण व उद्योजकता विकासासाठी कौशल्य प्रशिक्षण देणे, असे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या सर्व योजनांची जागतिक महिला दिन म्हणजे ८ मार्चपासून अंमलबजावणी केली जाणार आहे. या अभियानाची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी राज्य, विभाग, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत पातळीवर समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत.

संपादन- भूषण श्रीखंडे