दारू प्याल्यास दहा हजाराचा दंड! 

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 5 December 2019

नंदुरबार : पती, मुलांच्या दारूच्या व्यसनामुळे वैतागलेल्या समशेरपूर (ता.नंदुरबार) येथील महिलांनी पुढाकार घेत ग्रामसभेत दारूबंदीचा प्रस्ताव मांडला आणि तो ठरावही मंजूर करवून घेतला. याउपरही गावात कुणी दारू पिऊन आल्यास त्याला दहा हजाराचा दंड करण्याचा निर्णयही ग्रामसभेने घेतला आहे. महिलांच्या या निर्णयाने गावात दारूला नक्कीच अटकाव होईल. 

समशेरपूर गावात दारुमुळे अनेक कुटुंबांमध्ये कलह निर्माण झाले आहेत. तरुण, प्रौढ व्यक्तींसह तरुण मंडळीही दारुच्या आहारी गेल्याने दररोजची भांडणे ही ठरलेलीच होती. व्यसन करणाऱ्या पाठोपाठ त्यांचे कुटुंबिय व गावातील प्रत्येकाला त्याचा त्रास सहन करावा लागत होता. त्यामुळे तेथील दारुविक्रीवर बंदी आणावी असा निर्णय महिलांनी घेतला. परंतु यासाठी पुरूषमंडळीतील कुणीही पुढे येत नव्हता. यावर मात करण्यासाठी अखेर तेथील बचत गटाच्या महिलांनीच पुढाकार घेतला. त्यांनी ग्रामसभा घेत दारूबंदीबाबत काही ठराव मंजूर करुन घेतले. 

हेही वाचा > खवय्यानो...आता हिवाळ्यात चिकनवर मनसोक्‍त ताव मारता येईल 

महिलांचा पुढाकार
दारुविक्री करणारे व दारुचे व्यसन करणाऱ्यांविरुद्ध बचतगटाच्या महिला उभ्या राहिल्या असल्या तरी ही बाब अवघ्या गावाच्या हितासाठीच असल्याने काही पुरूषही त्यांच्यासोबत आले आहेत. या निर्णयामुळे गावातील मोठ्या समस्यावर मात करता येणार असल्यामुळे ग्रामस्थ महिलांचे कौतुक करीत आहेत. महिलांनी घेतलेल्या या निर्णयाचे आता पोलिस व महसूल प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी हा आदर्श अन्य काही गावांमधील महिलांनी देखील घ्यावा असे म्हटले अशी मागणी होत आहे.

क्‍लिक करा > खिचडी खायला मिळणार...  

असा दंड, असे बक्षीस 
दारु पिणाऱ्याला - १० हजार दंड 
दारु विक्रेत्याला - २० हजार दंड 
तीन किलोमीटरच्या आत दारु तयार करणाऱ्याला - ५० हजाराचा दंड 
दारुची माहिती देणाऱ्याला - पाच हजारांचे बक्षीस 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar wine 10 thousand woman gramsabha