
अक्कलकुवा तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी युवकमित्र परिवार नंदुरबार या संस्थेचा प्रयत्न असून 'पोषण आहार जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला.
तळोदा (नंदुरबार) : अक्कलकुवा तालुक्यातील १५ गावातील २५९ कुपोषित बालकांना वायफोरडी फाउंडेशन, पुणे व युवकमित्र परिवार, नंदुरबार यांच्यातर्फे डीएम फेलो उपक्रमांतर्गत महाशक्ती न्यूट्रिशन अॅण्ड मल्टीव्हिटॅमिन सॅचेट वितरित करण्यात आले. एकूण ९ व्हिटॅमिन असणारे हे सॅचेट कुपोषित बालक व त्यांच्या माता यांना जीवनसत्त्व पुरवते, त्यामुळे हे फारच उपयुक्त आहे.
अक्कलकुवा तालुक्यातील कुपोषण निर्मूलनासाठी युवकमित्र परिवार नंदुरबार या संस्थेचा प्रयत्न असून 'पोषण आहार जनजागृती उपक्रमांतर्गत हा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी पिरामल फाउंडेशन डीएम फेलोशिपच्या १५ फेलो स्टुडंट्स यांनी आदिवासी पाड्यामध्ये जाऊन कुपोषित बालक शोधमोहीम राबवीत तब्बल २५९ बालकांचा शोध घेत सर्व बालक व त्यांच्या मातांना हे कीट वाटप करण्यात आले आहेत. यासाठी युवकमित्र परिवाराचे संस्थापक प्रवीण महाजन, वायफोरडी फाउंडेशनचे व्यवस्थापक सागर मानकर यांनी न्यूट्रिशन कीट उपलब्ध करून दिले. कार्यक्रम यशस्वितेसाठी डीएम फेलो डिस्ट्रिक्ट मॅनेजर किशोर घरत, अक्कलकुवा तालुका डीएम फेलो प्रमुख दविंदर कौर यांच्या मार्गदर्शनाखाली डीएम फेलो शुभम शिरसोले, बेनिटो जायडस, मोहम्मद हबीब, अर्पित चौधरी, यश अहिहराव, तुषार महिरे, पियुष भादे, के. हबीब, सौमेन साऊ यांनी परिश्रम घेतले.