नंदुरबार जि. प.अध्यक्षपदी सीमा वळवी; भाजप तटस्थ 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 17 January 2020

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषदेच्या शेवटपर्यंत उत्कंठापूर्ण राहिलेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने अचानक माघार घेत अध्यक्षपदासाठी कॉग्रेस-शिवसेनेच्या सीमा पद्माकर वळवी यांना समर्थन दिले. यामुळे अध्यक्षपदी सीमा वळवी सहज निवडून आल्या. उपाध्यक्षपदासाठी शिवसेनेचे राम रघुवंशी निवडून आले. 

हेही पहा - भाजपमधील बेशिस्ती उघड 

नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाची निवड प्रक्रिया आज झाली. अध्यक्ष निवड प्रक्रियेत भाजपकडून देखील दावा करण्यात आला होता. परंतु ऐनवेळी माघारी घेत तटस्थ राहण्याची भुमिका घेतली. सभागृहात अध्यक्ष निवडीसाठी झालेल्या मतदानावेळी भाजप आश्‍चर्यकाराकरित्या तटस्थ राहिली. राम रघुवंशी यांना तीस मते पडली. या प्रक्रियेत हात उंचावून मतदान घेण्यात आले. अध्यक्षपदाची निवड बिनविरोध करावी अशी मागणीही भाजपने केली; मात्र भाजपने वेळेत माघार न घेतल्याने नियमानुसार प्रक्रिया झाली. 

शिवसेनेच्या हाती चाबी 
जिल्हा परिषदेच्या स्थापनेनंतर यंदाच्या निवडणुकीत यंदा प्रथमच कोणत्याही एका पक्षाला बहुमत मिळाले नव्हते. कॉंग्रेसला 23, भाजपला 23 आणि शिवसेनेला 7, राष्टवादीला तीन जागा मिळाल्या, त्यामुळे सत्तेच्या चावी शिवसेनेकडे आली होती. निवडणुकीनंतर शिवसेनेसह कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news nandurbar zp president election sima valvi