
आरटीओच्या पंटर अनाधिकृत कर्मचारी महसूल बुडवून चेक पोस्ट च्या मागील बाजूच्या बंधारफळी गावाच्या रस्त्याने हजारो गाड्या पास करत आहे.
विसरवाडी : आंतरराज्य गुजरात राज्याच्या सीमेवरील परिवहन विभागाचे आरटीओ सीमा तपासणी नाका गुजरात राज्याच्या धर्तीवर कायमचे बंद बंद करावे असे मागणीचे निवेदन सरपंच रामु सुरजी गावित ग्रुप ग्रामपंचायत बंधारफळी (बेडकी)ता.नवापूर यांनी परिवहन मंत्री, दिवाकर रावते यांना दिले आहे.
वाचा- आरटीईच्या प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आणखी एक संधी
सरपंच गावित यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील आरटीओ सीमा तपासणी नाका चेक पोस्ट च्या मागील बाजूच्या बंधारफळी गावाच्या कच्च्या रस्त्याने नियमांना डावलून ओव्हरलोड गाड्या आरटीओच्या अनाधिकृत कर्मचारी (पंटर) महसूल बुडवून हजारो गाड्या पास करतात. त्यामुळे गावाच्या रस्त्याची दुरावस्था, प्रदूषण वाढणे, तसेच वाहनचालक गावातील महिलांचे नाव घेणे असले प्रकार होवू लागले आहे. याबाबत नवापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल झाले आहे त्यामुळे हे चेक पोस्ट बंद करावे अशी मागणी केली निवेदनातून केली आहे.
करोडो रुपयांचा महसुल बुडतोय
सुरत नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा बेडकी ता. नवापूर आंतरराज्य सीमा तपासणी आरटीओ चेक पोस्ट वर सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहे. वजन काट्यात देखील मोठा झोल केला जात आहे. ओव्हरलोड गाड्या आरटीओच्या पंटर अनाधिकृत कर्मचारी महसूल बुडवून चेक पोस्ट च्या मागील बाजूच्या बंधारफळी गावाच्या रस्त्याने हजारो गाड्या पास करत असल्याने शासनाचा करोडो रुपयांच्या सेवा कर जीएसटी बुडवीला जात आहे. त्यामुळे गुजरात राज्याच्या धर्तीवर बंद केलेले आरटीओ तपासणी नाके मोजे बेडकीचे सुद्धा कायमचं बंद करावे मंत्री रावतेंना केली आहे.
संपादन- भूषण श्रीखंडे