अहो,गारठा वाढला...व्यायाम,चालणे,फिरणे तर हवचं

residentional photo
residentional photo

नाशिक ः वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. हिवाळा हा आरोग्यसंवर्धनासाठी महत्त्वाचा ऋतू मानला जातो. त्यामुळे मुबलक प्रमाणात पालेभाज्या, सकस आहार घेऊन व्यायाम करण्याकडे तरुणाईसह सर्वच वयोगटांचा कल असतो. हिवाळ्याची सुरवात होताच आता पायी चालणे, ग्रीन जिम तसेच जिममध्येही गर्दी वाढू लागली आहे. विशेष म्हणजे जिममधील अत्याधुनिक साहित्याची तरुणाईला भुरळ पडली आहे. या साहित्याद्वारे चांगली शरीरयष्टी कमविण्यासाठी थंडीत घाम गाळला जात आहे. 

तरूणाई,महिलांचा अधिक सहभाग

शरीर सौष्ठवासाठी नियमित व्यायाम करणाऱ्यांबरोबरच हौशी तरुण-तरुणींचीही सध्या संख्या वाढली आहे. हिवाळ्याची चाहूल लागताच शहरातील तरुणाई व महिलांची पावले जिमकडे वळू लागल्याने जिममधील गर्दी वाढू लागली आहे. जिम हे आधुनिक व्यायामाचे ठिकाण बनले आहे. जिम व हेल्थ क्‍लबची संख्या शहरात दिवसेंदिवस वाढत आहे. जिमचा दर्जा तेथील अत्याधुनिक सुविधा व साधनांवर अवलंबून असतो. त्यानुसार त्यांचे शुल्क आकारले जाते. सहाशे रुपयांपासून ते दीड हजारांपर्यंत महिन्याचे शुल्क आकारण्यात येत आहे. क्रॉसफिट, योगासने, झुंबा, किक बॉक्‍सिंग, स्पिनिंग, एरोबिक्‍स अशा वेगवेगळ्या व्यायामप्रकारांकडे तरुणवर्ग आकर्षित होत आहे. 

नक्की वाचा-वेतन मिळाले नाही म्हणून अंगावर ओतले रॉकेल

आधुनिक उपकरणांचा वापर 
जिममध्ये व्यायामासाठी विविध उपकरणांचा वापर होतो. यामध्ये प्रामुख्याने कार्डिओ मशिन, पॉवर लिफ्टिंग, ऍब्डॉमिनल मशिन, लिव्हरेज, इंक्‍लाइन प्रेस, बारजॉगर, बुलवर्कर, डंबल, स्टनिंग सायकल, लाग्यपूल डाउन, सिटीड रोअर, पॅनटेक चेस्ट मशिन, फोरामस मशिन या साधनांचा समावेश आहे. यात वेटलॉस, वेटगेन, बॉडीबिल्डिंग, जनरल फिटनेस, स्टीम बाथ अशी व्यायामाची वर्गवारी आहे. फॅशनच्या दुनियेत कपड्यांप्रमाणेच स्लिम दिसण्याची क्रेझ महिला, मुलींमध्ये दिसते. त्यासाठी डाएट, जिम सुरू केले जाते. मात्र अशा गोष्टी शक्‍यतो फिटनेस ट्रेनर अथवा डॉक्‍टरांच्या सल्ल्याने करणे योग्य ठरते. 


गेल्या दोन-तीन वर्षांपासून जिममध्ये येणाऱ्या तरुणांचे प्रमाण वाढले आहे. नोकरी करताना आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जिमच्या माध्यमातून फिटनेस कायम राखण्यावर तरुणांचा वाढता कल आहे. हिवाळ्यात चांगल्या शरीरयष्टीसाठी तरुणांचे जिममध्ये प्रमाण वाढत आहे. 
-अभिजित गौड, फिटनेस ट्रेनर 
---- 
धावपळीच्या युगात शरीराकडे जास्त लक्ष दिले जात नाही. यासाठी तरुण-तरुणी सोळाव्या वर्षानंतरच शरीरसौष्ठवासाठी जिमला सुरवात करतात. व्यायामासोबतच डाएट प्लॅनसंदर्भातही मार्गदर्शन केले जात असून, त्याचा तरुणाईला उपयोग होतो आहे. 
-अजिंक्‍य तपकिरे, संचालक (माइल्सस्टोन जिम) 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com