अगोदर दिली धमकी मग रात्री संधी साधत क्‍वारंटाईन केलेल्या युवकांनी केले भलतेच 

सकाळ वृत्तसेवा
Monday, 27 April 2020

जेवण व्यवस्थित नसून  कुठल्याही सुविधा नाहीत असा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल केला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास पळाले बारा  तासानंतर आज दुपारी खातगाव रेल्वे स्थानकावर सात जण  सापडले एकाचा शोध सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी यांना शोधून काढले. 
 

नवापूर :  येथिल शेल्टर होम मध्ये ठेवलेल्या मध्यप्रदेशातील ३४ पैकी आठ युवकांनी काल रात्री साडेअकरा च्या सुमारास खिडकीची लोखंडी जाळी तोडून पळाले होते. सात जणांना आज दुपारी खातगाव रेल्वे स्थानकावर पकडले.
येथिल शेल्टर होममध्ये ठेवलेल्या मध्यप्रदेशातील ३४ पैकी आठ युवकांनी काल रात्री साडेअकराच्या सुमारास पळ काढला. खिडकीची लोखंडी जाळी तोडून पोबारा केला.  जेवण व्यवस्थित नसून  कुठल्याही सुविधा नाहीत असा व्हिडीओ दोन दिवसांपूर्वीच सोशल मीडियावर व्हायरल केला होता. रात्री साडेअकराच्या सुमारास पळाले बारा  तासानंतर आज दुपारी खातगाव रेल्वे स्थानकावर सात जण  सापडले एकाचा शोध सुरू आहे. स्थानिक पोलिसांनी यांना शोधून काढले. 
 
व्हिडीओ केला व्हायरल
नवापूर येथील वरिष्ठ महाविद्यालयात तयार केलेल्या क्वारोंटाइन कक्षाच्या इमारतीत शेल्टर हाऊसच्या एका खोलीत किंम (जि सूरत, गुजरात) या गावात मजुरी करणारे मध्यप्रदेश राज्यातील ३४ जणांना ठेवले होते. या सर्वांना ६ एप्रिलला नवापूर पोलिसांनी ताब्यात घेऊन सीमा तपासणी नाक्याच्या इमारतीत शेल्टर होममध्ये ठेवले होते, या ठिकाणी प्रशासनाला काही अडचणी आल्याने या मजुरांना तीन दिवसांपूर्वीच  नवापूर शहरातील वरिष्ठ महाविद्यालयाच्या क्वारोंटाइन इमारतीत आणले होते. २५ एप्रिलच्या रात्री या लोकांनी जेवण निकृष्ट दर्जाचे मिळत आहे, कुठल्याही व्यवस्था नाहीत, आम्हाला सुविधा पुरवल्या नाहीत तर आम्ही पळ काढू, आमच्या मध्यप्रदेश सरकारकडे मदतीची मागणी करू असा व्हिडीओ सोशल मीडियावर वर व्हायरल केला होता. 

दुसऱ्या दिवशी सकाळी २६ एप्रिलला तहसीलदार उल्हास देवरे, गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, पोलीस निरीक्षक विजयसिंग राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. हरिश्चंद्र कोकणी यांनी संबंधित मजुरांची भेट घेतली. त्यांच्या मागण्यांनुसार सुविधा उपलब्ध करुन दिली. जेवण व्यवस्थित मिळेल याची काळजी घेतली. तरी आठ लोकांनी २६ एप्रिलच्या रात्री खिडकीचे गज तोडून पलायन केले.

प्रशासनला धमकी 
तहसीलदार श्री देवरे आपल्या पथकासह क्वारोंटाइन कक्षेत भेटीसाठी गेले त्यावेळी क्वारोंटाइन व शेल्टर होम मधील लोकांनी धुलाकुल घातला होता.  पळून जाण्याची, आत्महत्या करून घेण्याची धमकी देत होते. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता प्रशासनाने संयम ठेवत क्वारोंटाइन केलेल्या लोकांना पाहिजे असलेल्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. तरी काहींनी रात्री पळ काढून प्रशासनाची डोकेदुखी वाढवली आहे. 

तीन दिवस पायपीट
गुजरात राज्यातील किंम या गावात मजुरी करणारे ३४ मजूर  रेल्वे रुळाच्या मार्गाने ११० किलोमीटर तीन दिवस पायपिट करत नवापूरला ६ एप्रिलला  सकाळी सातला पोहचले. याबाबत पोलिस यांना माहिती मिळताच त्यांनी  सर्व मजुरांना विचारपूस करून ताब्यात घेतले. त्या सर्वांना येथील जुन्या सीमा तपासणी नाक्या जवळ थांबवले. या सर्वांना संचारबंदी लागू असेपर्यंत सोडता येणार नव्हते. नवापूर क्वारोंटाइन कक्षात व शेल्टर होममध्ये ठेवलेल्या लोकांनी पळ काढू नये, शांतता भंग करू नये यासाठी बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur corona quarantine boy Ran away