esakal | लाकडाची तस्‍करी करणाऱ्या संशयिताच्‍या घरावर वनविभागाच्या पथकाची कारवाई 
sakal

बोलून बातमी शोधा

लाकडाची तस्‍करी करणाऱ्या संशयिताच्‍या घरावर वनविभागाच्या पथकाची कारवाई 

नवापूर, नंदुरबार व धुळे वनविभागाच्या पथकाने नवापूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. मात्र, संशयित फरारी झाला. 

लाकडाची तस्‍करी करणाऱ्या संशयिताच्‍या घरावर वनविभागाच्या पथकाची कारवाई 

sakal_logo
By
विनायक सुर्यंवशी

 नवापूर  : जामतलाव (ता. नवापूर) येथील अवैध लाकडाची तस्करी करणाऱ्या संशयिताच्या घरी सर्च वारंटने शुक्रवारी  सकाळी साडेदहाच्या सुमारास वनविभागाने छापा टाकला. घरात व घराच्या आजूबाजूला वनरक्षक बोरझर (ता. नवापूर) यांच्याकडील प्रथम रिपोर्टमधील फरार दोन वाहने, अवैध लाकूडसाठा, रंधा मशिन आदी १२ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. नवापूर, नंदुरबार व धुळे वनविभागाच्या पथकाने नवापूर पोलिसांच्या मदतीने ही कारवाई केली. मात्र, संशयित फरारी झाला. 


संशयित परेश गावित याच्या घराची सहाय्यक वनसंरक्षक (प्रादेशिक व वन्यजीव) यांच्यासह वनक्षेत्र नवापूर, चिंचपाडा, खांडबारा, शहादा, नंदुरबार, काकडदा मोबाईल स्काॅड शहादा, वनक्षेत्र कोंडाईबारी, पिंपळनेर वनक्षेत्रपाल वनपाल व वनरक्षकांनी झडती घेतली. घरात रंधा मशिन, डिझाईन मशिन, पाया उतार मशिन, डिझेल इंजिन मशिन व ताज्या तोडीचे साग चौपाट सहा नग मिळाले. घराचे दोन्ही बाजूस फरार असलेले वाहन (एमएच ३९, जे ८७७२) व टीयुव्ही ३०० लाल रंगाची महिंद्रा कंपनीचे व टाटा सुमो पांढऱ्या रंगाची (जीजे १६, डब्लू ३९३८) ही वाहने आढळून आली.

दोन्ही वाहने, मुद्देमाल व यंत्र सामुग्री नवापूरचे पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत व कर्मचाऱ्यांच्या मदतीने जप्त केले. मिळालेली वाहने व साहित्य येथील शासकीय विक्री आगारात वनपालाच्या ताब्यात दिली. जप्त वाहन व मुद्देमालाची किंमत अंदाजे १२ लाख रुपये आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे