esakal | अन विहिर दुधाने भरली; कशी ते वाचा !
sakal

बोलून बातमी शोधा

अन विहिर दुधाने भरली; कशी ते वाचा !

दुध रस्त्यावर वाहून जात असल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी दुध घेण्यासाठी धावत घेतली. मिळेल त्या भांड्यात दुध घरी नेले.

अन विहिर दुधाने भरली; कशी ते वाचा !

sakal_logo
By
विनायक सुर्यंवशी

नवापूर :  शहरातुन वाहणाऱ्या रंगावली नदीवरील व धुळे-सुरत या राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर आज सकाळी साडे सहाला ट्रक आणि टॅकर मध्ये समोरासमोर धडक झाली. दुधाने भरलेला टँकर पुलाचे कठडे तुटल्याने नदीपात्रात पडला. या अपघातात टँकर चालक जखमी झाला. दूध गळती झाल्याने स्थानिक नागरिकांनी दूध मिळेल त्या भांड्यात वाहून नेले. 

अपघात ग्रस्त टँकर २५ हजार लिटर दुधाने भरलेला होता. अपघात होताच टँकर मधील दुध रंगावली नदीत पात्रात वाहू लागले. आश्चर्यकारक म्हणजे शेजारील छोटीशी विहिर दुधाने भरून गेली. दुध रस्त्यावर वाहून जात असल्याचे दिसताच स्थानिक नागरिकांनी दुध घेण्यासाठी धावत घेतली. मिळेल त्या भांड्यात दुध घरी नेले. दुध घेऊन जाण्यासाठी चांगलीच झुंबड उडाली. 

धुळे सूरत या राष्ट्रीय महामार्गासह  रंगावली पुलावर मोठेमोठे खड्डे पडेल आहेत. खड्डे चुकवण्याच्या प्रयत्नात सुरतकडून धुळेकडे जाणारा ट्रक ( क्रमांक जी. जे. १०- टी. व्ही. ९९६८ )  समोर मोठा खड्डा असल्याचे दिसल्यास अचानक विरुद्ध बाजूला वळण घेतल्याने समोरून येणाऱ्या दुध टँकरला जोरदार धडक दिसल्याने टँकर नदीत कोसळला. यात चालक गंभीर जखमी झाला.  टॅकर मध्ये चालकाचे पाय अडकवून गेल्याने बाहेर काढणे अवघड जात होते. स्थानिक लोक व १०८ या  रूग्णवाहिकेच्या मदतीने टँकर चालकाला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ पाठवण्यात आले आहे.यावेळी आजूबाजूलाचा नागरिकांनी मोठय़ा प्रमाणात गर्दी केली.घटनास्थळी तात्काळ नवापूर पोलीसांनी हजेरी लावून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. 

धुळे-सुरत महामार्गावर मोठमोठे खड्डे अपघातास कारणीभूत ठरत असल्याने संबंधित विभागाचे अधिकाऱ्यांवर व ठेकेदार योग्य कारवाई करण्याची मागणी आमदार शिरिषकुमार नाईक यांनी केली आहे.

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image
go to top