वाट हरवीलेल्या चितळ ला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी सोडले त्याच्या अधिवासात 

विनोद सूर्यवंशी 
Wednesday, 12 August 2020

चितळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेतली. चितळाला ठाणेपाड्याच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यापूर्वी काळवीट व नीलगाय हेही रेस्क्यू करण्यात आले होते.

नवापूर : निसर्ग संपन्न व जंगलाचा मोठा परिसर लागून असून असलेल्या नंदुरबार मध्ये आज हरी ओम नगरात वाट हरविलेले चितळ प्रजातीची मादी नागरिकांनी आढळली. नागरिकांनी त्वरीत वन विभागाच्या कर्मचाऱयांना संपर्क साधून या चितळ प्रजातीच्या (मादी) रेस्क्यू करून ठाणेपाड्याच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. 

आज सकाळी शहरातील हरी ओम नगर परिसरात चितळ या प्राण्याच्या वावर नागरिकांनी पाहिला. या बाबत आज सकाळी अकराला वन विभागाला नागरिकांनी माहिती दिली. त्यावरून नंदूरबारचे  सहाय्यक वनसंरक्षक (प्राणी व वन्यजीव ) गणेश रणदिवे यांच्या  मार्गदर्शनाखाली नंदुरबार वनक्षेत्रपाल एम के रघुवंशी, नांदरखे वनपाल संजय पाटील, आष्टा वनपाल युवराज भाबड, माजी सैनिक विशाल मराठे, वनमजुर हिम्मत चौरे व आवशा सूर्यवंशी यांनी नंदुरबार येथील हरी ओम नगर येथून चितळ  प्रजातीचे (मादी) रेस्क्यू केले. 

तीच्या तिला अधिवासात सोडले
चितळ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करून घेतली. चितळाला ठाणेपाड्याच्या जंगलात नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. यापूर्वी काळवीट व नीलगाय हेही रेस्क्यू करण्यात आले होते. नागरिकांना शहरात वन्यप्राणी दिसले तर वन विभागाला संपर्क साधावा असे अहवान वन विभागाने केले आहे.

नंदूरबार जिह्यातील जंगलात वन्यप्राण्यांची संख्या वाढत आहे, हरणांची वाढती संख्या, चितळ, काळवीट यांचे जंगलातील वावर म्हणजे जंगलातील वन्यप्राण्याचे चक्र लवकरच पूर्ववत होईल अशी अपेक्षा आहे.
गणेश रणदिवे, सहाय्यक वनसंरक्षक, नंदुरबार

 

संपादन-भूषण श्रीखंडे

  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news navapur rescue of chital animals by forest department staff