esakal | अंत्यसंस्काराला महिला गेली...आणि कोरोना सोबत घेवून आली ! 
sakal

बोलून बातमी शोधा

अंत्यसंस्काराला महिला गेली...आणि कोरोना सोबत घेवून आली ! 

चौदा दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. धुळे येथील कोरोना तपासणी करणारी लॅब बंद पडल्याने नऊ दिवस उशिराने अहवाल आला. 

अंत्यसंस्काराला महिला गेली...आणि कोरोना सोबत घेवून आली ! 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवापूर : शहरातील मंगलदास पार्क मधील ६५ वर्षीय महिलेचा अहवाल आज दुपारी कोरोना पॉझिटिव्ह आला. प्रशासनाने पाचशे मीटरचा परिसर सील करण्यात केला. सदर महिला नऊ दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात उपचार घेत आहे. परिवारातील अकरा सदस्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची लक्षणं नसली तरी खबरदारी म्हणून क्वारोंटाइन कक्षेत ठेवण्यात आले.शहर दोन दिवस बंद ठेवण्यात आले असून मंगलदास पार्क परिसर चौदा दिवस कंटेन्मेंट झोन करण्यात आला आहे. 


नऊ दिवसांपूर्वीच (२५ जून ) सदर महिलेच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना होम क्वारोंटाइन केले होते. सदर महिला नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असून परिस्थितीत नियंत्रनात आहे. परिवारातील सर्व सदस्यांना अद्याप कुठल्याही प्रकारची लक्षणं नाहीत. शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास नवापूर शहरातील ६५ महिलेचा कोरोना अहवाल पुण्याहून पॉझिटिव्ह आला. अहवाल प्राप्त होताच गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर, मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, पोलिस निरीक्षक विजयसिंह राजपूत, तालुका आरोग्य अधिकारी डॉ शशिकांत वसावे, पालिकेचे अनिल सोनार,मिलिंद भामरे, सर्व प्रशासकीय टीम घटनास्थळी दाखल झाले. तहसीलदार सुनीता जर्हाड सायंकाळी घटनास्थळी आल्या. मंगलदास पार्क मधील बाधित व्यक्ती च्या घरापासून पाचशे मीटरचा परिसर सील करण्यात आला. चौदा दिवस कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केला असून कोणालाही घराबाहेर पडता येणार नाही. धुळे येथील कोरोना तपासणी करणारी लॅब बंद पडल्याने नऊ दिवस उशिराने अहवाल आला. 

अशी आहे घटना... 
शहरातील मंगलदास पार्क मध्ये वरखेडी (ता. भडगांव जि.जळगाव) मार्गे कोरोनाचा शिरकाव झाला. तब्बल नऊ दिवसांनी कोरोना तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंत्यसंस्काराला गेलेली ६५  महिला कोरोना बाधित व्यक्ती च्या संपर्कात आल्याने कोरोना विषाणूची लागण झाली. या घटनेला आज चौदा दिवस झाले. २० जूनला  संशयीत व्यक्ती वरखेडी (ता. भडगांव जि.जळगाव)  मयतीमध्ये गेल्या होत्या. तेथे एक पॉझिटिव्ह व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आली होती. त्यातील काही लोक पॉझिटिव्ह आले. सदर महिलेला २३ जूनला त्रास सुरू झाला. सुरवातीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केली.  समाधान कारक उपचार झाला नाही म्हणून शहरातील एका खाजगी डॉक्टर कडे उपचार चालू होते. त्यांनी  उपचार केले होते. त्यांना  कोरोनाची लक्षणे जाणवल्याने.  पुढील उपचारासाठी २५ जूनला सुरत येथील मैत्रेय हाॅस्पीटल मध्ये तपासणीसाठी पाठवले. तेथे City Scan केले  त्यात न्यूमोनिया असल्यामुळे त्यांना suspected positive सांगितले होते. २५ जूनला नवापूर शहरात सदर महिला कोरोना बाधित असल्याची अफवा पसरली, मात्र नवापूर प्रशासनाने त्यांना  सुरत येथून नंदुरबार जिल्हा रुग्णालयात  swab साठी पाठवले. त्यांना  सिव्हीलला दाखल केले. त्यांचा स्वाब तिसऱ्या दिवशी घेतला. धुळे येथील तपासणी लॅब बंद पडल्याने आज पुण्याहून अहवाल पॉझिटिव्ह आला. या प्रक्रियेला तब्बल नऊ दिवस आणि सुरवातीचे पाच असे आज चौदा दिवस पसार झाले. 

२० ते २५ जून या कालावधीत सदर महिलेच्या कुटुंबातील मोठा मुलगा भाजीपालाच्या लिलावात सहभागी झाला आहे. सदर व्यक्ती च्या संपर्कात किती जण आले त्याचा शोध घेणे, सदर महिलेला  सुरवातीला नवापूर उपजिल्हा रुग्णालयात कोणी तपासणी केली, नंतर शहरातील खाजगी डॉक्टराणे तपासून उपचार केले, सदर डॉक्टर हे गुजरात राज्यात वैद्यकीय अधिकारी आहेत. त्यांनी या दहा ते बारा दिवसांत नवापूरला किती रुग्णांवर उपचार केले, त्यांच्या सोबत किती परिवार, यात  सदर डॉक्टराने आपल्या गुजरात राज्यातील दवाखान्यात किती जणांची  तपासणी केली, किती जण संपर्कात आले याची तपासणी करणे म्हणजे प्रशासनाची तारेवरची कसरत आहे. सदर डॉक्टर नवापूर शहरात वास्तव्यास आहेत तो भाग देखील कंटेन्मेंट झोन केला पाहिजे. सद्या सदर महिलेची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास नाही मात्र खबरदारी म्हणून सर्वाना क्वारोंटाइन  कक्षेत रवाना केले आहे.