esakal | coronavirus :ओमानमधून आलेला युवक होम क्वारंटाईन 
sakal

बोलून बातमी शोधा

coronavirus :ओमानमधून आलेला युवक होम क्वारंटाईन 

उच्छल तालुक्यातील एका गावातील एक ४५ वर्षीय गुजराती युवक ओमान येथे कामानिमित्ताने गेला होता. १८ मार्चला मुंबईला आला. त्यानंतर रेल्वेने सुरत व तेथून नवापूरला आला.

coronavirus :ओमानमधून आलेला युवक होम क्वारंटाईन 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नवापूर  : ओमानमधून आलेल्या गुजराती युवकाला त्याच्या परिवारासह चौदा दिवस आरोग्य विभागाच्या निगराणीत (होम क्वारंटाईन) ठेवण्यात आले आहे. नवापूर आजचा आठवडे बाजारही बंद करण्यात आला आहे. दरम्यान नागरिकांत हळूहळू दक्षतेबाबत सतर्कता वाढीस लागत आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून कुणीही घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. 

 
राज्यात कोरोना आजाराचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विदेशातून आलेल्या एका गुजराती युवकाला त्याच्या परिवाराच्या पाच सदस्यांसह नवापूर तालुक्यातील एका गावातील कुटुंबाला गावाताच १४ दिवस होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आरोग्य विभाग लक्ष ठेवून आहे. नवापूर तालुक्यातील ही पहिली घटना असली तरी जिल्हा व तालुका प्रशासनाने भिती न बाळगण्याचे आवाहन केले आहे. आपल्या घरात बाहेरून कोणी पाहूणा आला असेल तर त्यांची माहिती तात्काळ प्रशासनाला द्यावी असे सांगण्यात आले आहे. 
 
उच्छल तालुक्यातील एका गावातील एक ४५ वर्षीय गुजराती युवक ओमान येथे कामानिमित्ताने गेला होता. १८ मार्चला मुंबईला आला. त्यानंतर रेल्वेने सुरत व तेथून नवापूरला आला. युवकाचे शालक नवापूर रेल्वे स्थानकावर घेण्यासाठी गेले. मोटरसायकलीवरून त्यांना नवापूरहून नवापूर तालुक्यातील एका गावात आणण्यात आले. तेथे त्याचे सासर आहे. 

याबाबत समजताच आरोग्य, महसूल, पोलिस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत गुजराती युवक व त्यांच्या परिवारातील पाच सदस्यांची आरोग्य तपासणी केली. त्यांना १४ दिवसाच्या निगराणीत ठेवण्यात आले आहे. तेथे प्रशासनाने एक स्वतंत्र टिम तयार करून लक्ष ठेऊन आहे. कोरोनाची काही लक्षणे दिसून आल्यावर रक्ताचे नमुने घेऊन तपासणी केली जाईल जर लक्षण दिसून आले नाही तर १४ दिवसाची कोरोना होम कोरनटाईम काढून परिवाराची सुटका करण्यात येईल अशी माहिती नवापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी दिली. याआधी गुरूवारी त्या गुजराती युवकाने नवापूर शहरात फेरफटका मारला, पालिकेच्या यूनियन बॅकेतील एटीएममधून पैसे काढले. 
 

loading image