esakal | धुळे सुरत महामार्गाच्या दुरुस्तीला अखेर सुरवात
sakal

बोलून बातमी शोधा

धुळे सुरत महामार्गाच्या दुरुस्तीला अखेर सुरवात

नवापूर तालुक्यातील महामार्गावरील दुरूस्ती पावसाच्या पुर्वी केल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात झाली होती.

धुळे सुरत महामार्गाच्या दुरुस्तीला अखेर सुरवात

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा


नवापूर : धुळे - सुरत या राष्ट्रीय महामार्गाच्या धुळे व नंदुरबार जिल्यातील 149 किलोमीटरच्या दुरुस्तीच्या कामाला नवा पुरकडून सुरुवात झाली आहे. चौपदरीकरांनाला दिवाळीनंतर सुरू होणार आहे.
लाॅकडाऊन पुर्वी दुरुस्ती कामाला करण्यात सुरूवात करण्यात आली होती.  परंतू कोरोना मुळे काम  अर्धवट सुटले होते.  आता संचारबंदी उठल्याने  महामार्ग दुरूस्ती कामाला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे. सद्या नवापूर चेक पोस्ट पासून वाकीपाडा पुलापर्यत दुरूस्ती काम चालू आहे.

नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा ते फागणे पर्यंत धुळे- सुरत राष्ट्रीय महामार्गाची चाळण झाली होती. दिड वर्षे वाहन चालक व प्रवाशांनी जीव मुठीत धरून प्रवास केला आहे. लाॅकडाऊन पुर्वी काम सुरू होते. मात्र कोरोना मुळे संचारबंदी लागू झाली आणि मजुराभावी काम बंद पडले.  मात्र आता संचारबंदीत सूट मिळाल्याने अर्धवट असलेले महामार्ग दुरूस्ती कामाला पुन्हा सुरूवात करण्यात आली आहे.

नवापूर तालुक्यातील बेडकीपाडा चेक पोस्ट पासून दहिवेल पर्यंत आणि दहिवेल पासून धुळे पर्यंत दोन टप्प्यांमध्ये दुरूस्ती करण्याचे काम सुरू आहे. यादरम्यान महामार्गावर प्रचंड खड्डे पडल्याने वाहन चालकांचे हाल होत होते. कोंडाईबारी घाटात तर महामार्गचे नामशेष होण्याच्या मार्गावर आला होता. यामुळे इंधन वेळ व पैशांची देखील नासाळी होत होती. अपघाताचे प्रमाण देखील वाढले होते.

नवापूर तालुक्यातील महामार्गावरील दुरूस्ती पावसाच्या पुर्वी केल्याने वाहन चालकांना दिलासा मिळाला आहे. अन्यथा रस्त्याची चाळण होण्यास सुरुवात झाली होती.
रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे असल्याने नवापूरहून धुळे जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागत होती. धुळे जाण्यासाठी अडीच तीन तासाचा लागतात परंतू रस्ता खराब असल्याने पाच सहा तास लागत होते. दुरूस्ती थोडा दिलासा मिळाला आहे. परंतू रखडलेले चौपदरीकरणाचे काम दिवाळी दरम्यान सुरू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली मुंबईच्या एका कंपनीला काम मिळाले आहे.

loading image