esakal | किराणा दुकानांतून सामान घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही  : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे
sakal

बोलून बातमी शोधा

किराणा दुकानांतून सामान घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही  : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्‍यक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ ठरवून दिलेली नाही. ते जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी जाऊ शकतात. त्याला वेळेचे बंधन नाही. सर्व पालिका मुख्याधिकारी, पोलिसांनीही किराणा घेण्यासाठी वेळेचे बंधन घालू नये, तसे केल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. 

किराणा दुकानांतून सामान घेण्यासाठी वेळेचे बंधन नाही  : जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

जळगाव ः जिल्ह्यात नागरिकांना जीवनावश्‍यक घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची वेळ ठरवून दिलेली नाही. ते जीवनावश्‍यक वस्तू, भाजीपाला घेण्यासाठी जाऊ शकतात. त्याला वेळेचे बंधन नाही. सर्व पालिका मुख्याधिकारी, पोलिसांनीही किराणा घेण्यासाठी वेळेचे बंधन घालू नये, तसे केल्यास कारवाईचा इशारा जिल्हाधिकारी डॉ.अविनाश ढाकणे यांनी दिला आहे. 

अशीही मनमानी 
जिल्ह्यात भुसावळ, बोदवड, मुक्ताईनगर, चोपडासह अनेक पालिका, नगरपरिषद क्षेत्रात नागरिकांना किराणा, भाजीपाला खरेदीसाठी सकाळी सहा ते दहा किंवा दुपारी चार ते सात अशी वेळ दिली आहे.यावेळेतच किराणा खरेदीची सक्ती केली जात आहे. यामुळे नागरिकांची एकच गर्दी किराणा दुकानात, भाजीपाला खरेदीच्या ठिकाणी होत आहे. "कोरोनो'त नागरिकांना जवळ एकत्र येऊ न देणे यासाठी संचारबंदी आहे. मात्र अनेक नगरपालिकांचे मुख्याधिकाऱ्यांनी वेळेचे बंधन दिले आहे. त्यावेळेनंतर किराणा घेण्यासाठी नागरिकांना पोलिसांचा चोप खावा लागतो. 


वेळेचे बंधन टाकू गर्दी करायला सांगू नका 

या पार्श्‍वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ.ढाकणे यांच्याशी संपर्क साधला असता जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी वेळेचे बंद नाही, अमुक वेळेतच खरेदी करा असेही आदेश दिलेले नाहीत. पालिका मुख्याधिकारी, पोलिस, तहसीलदारांनीही जीवनावश्‍यक वस्तू खरेदीसाठी वेळेचे बंधन घालू नये. तसे झाल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल. पोलिस, मुख्याधिकारी, तहसीलदारांनाही तशा सूचना देण्यात येतील.