अठ्ठावीस देशात उत्पादन घेऊन जाणाऱ्या अभ्यासू उद्योजिका

संतोष विंचू
गुरुवार, 8 मार्च 2018

येवला - स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. तिच्याकडे आपल्या कामावर नित्सिम प्रेम करण्याची ताकद असते. याच ताकदीच्या बळावर एक महिला कंपनीची प्रॉडक्शन आणि मार्केटिंगची जबाबदारी सांभाळते. अन पती व दूरद्रष्टी असलेल्या मुलाच्या बरोबरीने काम करून कंपनीचा उत्पादनाच्या निर्यातीचा झेंडा २८ देशांमध्ये फडकविते. येवल्यासारख्या दुष्काळी तालुक्यातील ही नक्कीच भूषणावह, अभिमानास्पद व आगळीवेगळी कहाणी आहे, येथील कृष्णा एंझीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संस्थापक संचालिका मीनल वर्मा यांच्या यशाची!

येवला - स्त्री ही त्याग, नम्रता, श्रद्धा व सुजाणपणा याची मुर्ती आहे. तिच्याकडे आपल्या कामावर नित्सिम प्रेम करण्याची ताकद असते. याच ताकदीच्या बळावर एक महिला कंपनीची प्रॉडक्शन आणि मार्केटिंगची जबाबदारी सांभाळते. अन पती व दूरद्रष्टी असलेल्या मुलाच्या बरोबरीने काम करून कंपनीचा उत्पादनाच्या निर्यातीचा झेंडा २८ देशांमध्ये फडकविते. येवल्यासारख्या दुष्काळी तालुक्यातील ही नक्कीच भूषणावह, अभिमानास्पद व आगळीवेगळी कहाणी आहे, येथील कृष्णा एंझीटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या संस्थापक संचालिका मीनल वर्मा यांच्या यशाची!

उद्योगपती विक्रम वर्मा व त्यांचा दूरदृष्टी असलेला मुलगा सम्राट वर्मा यांच्यासह गेल्या तीस वर्षांपासून या क्षेत्रात आपली हुशारीची चुणूक दाखवलेल्या मीनल वर्मा यांच्या योगदानातून अवघ्या तीन किलोमीटरवर नांदेसर शिवारात भव्यदिव्य आणि बहरलेल्या वातावरणात नजरेत पडते ते एन्झाईम व प्रोटीन उत्पादन करणारी कृष्णा एंझीटेक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी. अवघ्या पाच ते सहा वर्षांत कंपनी तब्बल २८ देशात आपला नावाचा झेंडा मिरवते आहे. लग्नानंतर सासरे कै. सत्यनारायणसेठ वर्मा यांनी स्थापन केलेल्या आणि आशिया खंडात एकमेव असलेल्या एन्झोकेम लॅबरोटरी प्रा. ली. या नामांकित कंपनीत एक महिला असूनही त्यांनी आपल्या कामाची छाप पाडली. 

एन्झोकेम मध्ये कॉलिटी कंट्रोल, मायक्रोबायोलॉजी, आर. अँड डी., प्रॉडक्शन अशा विविध विभागात कामाचा ठसा उमटवल्यानंतर आशिया खंडातील नामवंत अशा या कंपनीत मार्केटिंगची जबाबदारी सांभाळून कंपनीला एका उंचीवर नेण्यासाठी मोठे योगदान त्यांनी दिले आहे.

तब्बल तीस वर्ष उत्पादन आणि विक्रीच्या वेगळ्या क्षेत्रातला अनुभव असलेल्या मीनल वर्मा या कृष्णा एंझीटेकच्या संस्थापक संचालिका असून कंपनीत टेक्निकल कामाची धुरा सांभाळत आहे. जागतिक बाजारपेठेत भारताचा नावलौकिक वाढविण्यासाठी त्यांनी २० देशांमध्ये दौरे केले आहे. परदेशात येथील उत्पादन पोहोचविण्यास व्यापाऱ्यांशी संपर्क, निर्यात, एक्जीबीसन मध्ये सहभाग, नव्या तंत्राचा स्वीकार, उत्पादनातील दर्जा अशा सगळ्या गोष्टी स्वतः मिनल वर्मा पाहत असून त्यांच्या या अनुभवामुळेच कंपनीची गरुड भरारी सुरू आहे. आपल्या अनुभवाचा उपयोग त्या कंपनीच्या प्रगतीसाठी करत आहेतच शिवाय तरुण उद्योजक बनलेल्या मुलगा सम्राट याच्या त्या मार्गदर्शक देखील आहेत.

कच्चा मालाची उपलब्धतता, उत्पादन, निर्यात, व्यापार्याशी संपर्क, कामगाराशी जिव्हाळा या लाखमोलाच्या गोष्टी त्यांच्या कल्पक्तेमुळेच जुळून येत आहेत. व्यवसायात भरभराट करणाऱ्या सौ. वर्मा सामाजिक पातळीवर तितक्याच संवेदनशील आहे. पती, मुलाच्या वाढदिवसानिमित्त तसेच इतर वेळेसही गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, वह्या-पुस्तक वाटप करण्यात त्यांचा पुढाकार नेहमी असतो. शिरसगाव येथील वृद्धाश्रमातील निराधारांना तसेच मूकबधीर विद्यालयातील विशेष मुलांना देखील मदतीचा हात त्यांनी दिला आहे. शहीद जवानांच्या कुटुंबियांना भेटून त्यांचा सन्मान देखील वर्मा कुटुंबियांनी केला आहे. महिला असूनही मनाची तयारी, प्रचंड कष्ट, जिद्द आणि नाविन्याचा शोध या गुणांच्या बळावर मिनल वर्मा यांनी घेतलेली उद्योजक म्हणून भरारी निश्चितच इतर महिलांना एक रोल मॉडेल भूमिका असलेली आहे हे नक्की...!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news north maharashtra yeola woman's day special