
नाशिक- लोकसभा निवडणूकीची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.उत्तर महाराष्ट्रातील आठ मतदारसंघात कॉँटे
का ट्क्कर पहायला मिळणार आहे. माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे(धुळे) यांच्यासह नगरमधून
डॉ,सुजय विखे,रावेरमधून रक्षा खडसे,नाशिकमधून हेमंत गोडसे-समीर भुजबळ,दिंडोरीतून डॉ.भारती
पवार,धनराज महाले यांच्याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. पोस्टल मतमोजणीत गोडसे यांनी आघाडी घेतली असून आघाडीचे समीर भुजबळ पिछाडीवर आहे.
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरवात झाली आहे. पण यशापशाचे आडाखे कालपासूनच बांधण्यास
सुरवात झाली होती. आता फेऱ्यांमधून कल जसजसे हाती येतील.तदानाला 24 तास होताच यशापयशाचे
आडाखे बांधण्यास सुरवात झाली. प्रचारात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या या मतदारसंघामध्ये
प्रत्येकजण आपआपल्यापरिने उमेदवारांना पुढे नेत त्यांच्यावर पैजाही लावल्या आहेत. धुळे लोकसभा
मतदारसंघात माजी केंद्रीय संरक्षणमंत्री डॉ.सुभाष भामरे यांच्यापुढे कॉग्रेस,ऱाष्ट्रवादी आघाडीचे कुणाल पाटील
यांचे तगडे आव्हान होते, त्यातच अनिल गोटे यांनी अपक्ष उभे राहत तिरंगी लढतीत चुरस निर्माण केली होती
,. विकासकामाच्या जोरावर डॉ,भामरे तर जनसंपर्क व आप्तेष्टाच्या जोरावर पाटील आपले नशीब अजमावत
आहे,नाशिक लोकसभा मतदार संघात युतीच्या हेमंत गोडसेंना माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचे पुतणे
समीर भुजबळ यांचे आव्हान आहे, येथे अँड,माणिकराव कोकाटेनी उभे राहत चुरस वाढवली, सर्व राज्याचे लक्ष
लागलेल्या नगर मतदारसंघात माजी विरोधी पक्षनेते डॉ.राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र डॉ.सुजय विखे
यांच्यासमोर संग्राम जगताप यांच्या आव्हान असल्याने हा निकालही दोघांसाठी राजकीयदृष्टया वळण देणारा
ठरेल.
दिंडोरीत भाजपच्या उमेदवार डॉ. भारती पवार यांच्या कळवण-सुरगाणा, तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे धनराज
महाले यांच्या दिंडोरी-पेठ या "होमपीच'वरील आघाडीबरोबर शिवसेना-राष्ट्रवादीच्या गोटातून साधली गेलेली
"चुप्पी' निकालाचा कौल देणार आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे उमेदवार आमदार जे. पी. गावित यांचा
कळवण-सुरगाणा हा विधानसभा मतदारसंघ असून, संघटनात्मकदृष्ट्या पेठ, दिंडोरी, चांदवडमध्ये पक्षाचे
चांगले काम आहे. त्याचबरोबर राष्ट्रवादीची मदार असलेल्या मनमाड शहरात वंचित बहुजन आघाडीचा
बोलबाला राहिला आहे.
शिर्डी मतदारसंघही नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे, या मतदारसंघात युतीचे सदाशिव लोखंडे,आघाडीचे
भाऊसाहेब कांबळे यांच्यात चुरस असलेतरी भाजपचे भाऊसाहेब लोखंडेचा भूमिका महत्वाची होती. त्यामुळे
त्यांता काय परिणाम होतो.यामुळे हा निकालही उत्सुकतेचाच भाग असेल.
जळगाव मतदारसंघ नेहमीच वैयक्तीक राजकारणांबरोबरच संपर्क,गटातटात विभागलेला आहे. या मतदारसंघात युतीकडून उन्मेष पाटील हे नशीब अजमावत आहे. पाटील यांच्या उमेदवारीवरून झालेला गोंधळ आणि मेळाव्यात झालेली हाणामारी सर्वश्रृत आहे, त्यांच्यासमोर आघाडीच्या गुलाबराव देवकर यांचे आव्हान होते.भाजपच्या अंतर्गत बंडाळीचा देवकर यांना कितपत फायदा होतो. हा उत्सुकतेता भाग होतो, त्यामुळे निकाल का लागतो हेही महत्वाचे आहे,रावेर मतदार संघात भाजप जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे या बाजी मारतील. असा विश्वास व्यक्त होत असलातरी त्यांच्यासमोर आघाडीच्या उल्हास पाटील यांना तगडे आव्हान होते, त्यामुळे हा निकालही उत्तरमहाराष्ट्रासाठी महत्वाचा ठरणार आहे,
नंदुरबारमध्ये युतीच्या डॉ.हिना गावीत या पुन्हा नशीब अजमावत असून त्यांच्यासमोर आघाडीचे के.सी.पाडवी आणि भाजपचे बंडखोर सुहास नटावदकर यांचे आव्हान आहे, त्यामुळे कोण,किती आघाडी घेते हेही महत्वाचे ठरणार आहे,
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.