esakal | स्वस्त धान्य दुकानांवरही सोशल डिस्टसिंग, केशरी कार्डधारकांसाठी अद्याप निर्णय नाही!
sakal

बोलून बातमी शोधा

reshan dukan

स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांसाठी सोशल डिस्टसिंग बाबत सुचना देत आहे.मात्र मिळणारे मोफत धान्य हे केशरी किंवा प्राधान्य व बीपीएल धारकांना मिळेल याबाबत वरिष्ठ पातळीवर सुचना आल्या नसल्याने नेहमी प्रमाणे दर महीन्याचा माल ग्राहकांना मिळणार आहे

स्वस्त धान्य दुकानांवरही सोशल डिस्टसिंग, केशरी कार्डधारकांसाठी अद्याप निर्णय नाही!

sakal_logo
By
संजय पाटील

पारोळा : कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखणेसाठी प्रशासनाकडुन  खबरदारी घेतली जात आहे.यात स्वस्त धान्य दुकानात ग्राहकांची गर्दी वाढु नये यासाठी सोशल डिस्टसिंग पाळण्याच्या सुचना तहसिलदार अनिल गवांदे यांनी दिल्या आहेत.या पाश्वभुमीवर  ता,2 पासुन तालुक्यात धान्य वाटपास सुरुवात झाली आहे..यात स्वस्त धान्य दुकानदार ग्राहकांसाठी सोशल डिस्टसिंग बाबत सुचना देत आहे.मात्र मिळणारे मोफत धान्य हे केशरी किंवा प्राधान्य व बीपीएल धारकांना मिळेल याबाबत वरिष्ठ पातळीवर सुचना आल्या नसल्याने नेहमी प्रमाणे दर महीन्याचा माल ग्राहकांना मिळणार आहे.
कोरोनाच्या पाश्वभुमीवर केंद्र व राज्य सरकारकडुन विविध उपाययोजना केल्या जात आहे.अन्न नागरी पुरवठा मंत्री  छगन भुजबळ यांनी सार्वजनिक वितरण व्यवस्थेविषयी विविध सुचना दिल्या असल्याने जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शक सुचनेनुसार स्वस्त धान्य दुकानात गर्दी होणार नाही.यासाठी खबरदारी म्हणुन दुकानदारांनी सोशलडिस्टसिंग पाळुन कोरोना बाबत जागृतता बाळगण्याचे आवाहन केले आहे.

मीच माझा रक्षकची अंमलबजावणी गरजेची 
प्रशासनाने मी माझा रक्षक या उपक्रमाविषयी कठोर अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे.धान्य घेतांना ग्राहकांना स्वत: बरोबर कुटुंबाची देखील काळजी घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करण्याच्या सुचना केल्या तर निश्चितच या कार्यास मदत मिळणार आहे.

वितरण व सोशल डिस्टसिंग बाबत फिरते पथक 
तालुक्यात एकुण 125 स्वस्त धान्य दुकानात शासनाच्या आदेशानुसार लाभार्थ्यांना धान्य वितरण सुरुळीत व्हावे व वितरण करतांना सोशल डिस्टसिंग पाळले जाते की नाही याबाबत फिरते पथकाची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहीती पुरवठा अधिकारी पी ए पाटील यांनी दिली.यात तहसिलदार,पुरवठा निरीक्षक व तलाठी यांचा समावेश राहणार आहे. दरम्यान धान्य वितरण करतांना लाभार्थ्यांच्या तक्रारी येणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे आवाहन तहसिलदार अनिल गवांदे यांनी केली आहे.

धान्य दुकान दारांकडुन हात धुण्याच्या सुचना
कोरोना विषाणुच्या संसर्गामुळे दररोज रुग्णांचा संख्खेत वाढ होत असल्याने नागरिकांनी घरीच थांबुन मुलांसह कुटुंबातील व्यक्तींनी नियमितपणे हात धुण्याच्या सुचना स्वस्त धान्य दुकानदार दिलीप सोनकुळे हे ग्राहकांना देत असल्याने अनेकांनी त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
 

loading image