
सहा महिन्यांपासून पगार नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी काम बंद केले आहे. वेतन थकित होणे,पर्यायाने सुरक्षा कर्मचारींचे काम बंद होणे हा प्रकार वेळोवेळी होत असतो.
प्रकाशा : सुरक्षा यंत्रणे अभावी प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्प जणू आत्महत्यासाठीचे केंद्रच ठरू पाहात आहे. प्रकल्पावरील सीसीटीव्ही यंत्रणा बंद असून वेतनच नसल्याने सहा महिन्यापासून सुरक्षा रक्षकांनी काम बंद केले आहे. त्यामुळे येथील सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.संबधित विभागाने तातडीने लक्ष घालणे गरजेचे आहे.
आवश्य वाचा- दिवाळीनंतर कोरोनाचा धमाका; सावधानता बाळगणे हाच उपाय
प्रकाशा (ता.शहादा) येथील तापी नदीवर २००८ मध्ये बॅरेज मध्यम प्रकल्प उभारण्यात आला.त्याद्वारे लगेचच पाणी अडविले जात आहे.त्यामुळे पावसाळा वगळता बॅरेज मध्ये दरवर्षी प्रचंड जलसाठा निर्माण केला जातो. पाणी पातळी निरीक्षण व यांत्रिकी काम करणे सोपे व्हावे त्यादृष्टीने प्रकल्पावर सर्वीस रोड आहे.त्याच्या दोनही बाजूला गेट लावण्यात आले आहेत.अधिकारी,कर्मचारी वगळता प्रवेश नसतो.त्यासाठी सुरवातीपासूनच सुरक्षा रक्षक नेमले आहेत. त्यांना सुरक्षा रक्षक मंडळाकडून वेतन अदा केले जाते.
सहा महिन्यापासून वेतन नाही
परंतू जवळपास सहा महिन्यांपासून पगार नसल्यामुळे सुरक्षा रक्षकांनी काम बंद केले आहे. वेतन थकित होणे,पर्यायाने सुरक्षा कर्मचारींचे काम बंद होणे हा प्रकार वेळोवेळी होत असतो. त्यामुळे प्रकल्पाची सुरक्षा वाऱयावरू झाली आहे.
आत्महत्याचा होतोय सुसासाईट पाॅईंट
प्रकाशा बँरेज येथील सुरक्षा यंत्रणा नसल्याने प्रकल्पात उडी घेऊन अनेकांनी आत्महत्या केली आहे. दोन दिवसांपूर्वी बॅरेजच्या मुख्य गेट जवळ बेवारसरित्या दुचाकी ऊभी आढळून आली. तर बुधवारी बॅरेज पात्रात जोडप्याचे मृतदेह मिळालेत. सुरक्षा रक्षक ड्युटीवर असते तर ही दुचाकी कोणाची,ती ऊभी करणारा कोण, काय हे माहिती झाले असते. तसेच सुरक्षा रक्षक असल्याने त्यांना मज्जाव करता आला असता. तसेच येथील सीसीटीव्ही यंत्रणाही गेल्या काही महिन्यांपासून बंद पडली आहे. त्यामुळे प्रकल्पाजवळ ,परिसरात कोण येत आहे. कोण उडी घेत आहे हे समजतच नाही. त्यामुळे प्रकाशा बँरेज हे सुसासाईट पाॅईँट होत चालले आहे.
" प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्पासाठी च्या सुरक्षा रक्षकांची समस्या व बंद पडलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेच्या अडचणी संदर्भात सुरक्षा रक्षक मंडळ आणि यांत्रिकी विभागाकडे पाठपुरावा केला आहे. "
- बॅरेज प्रशासन
(प्रकाशा बॅरेज मध्यम प्रकल्प,)