esakal | मुंबईतील पावसाने रेल्वेसेवा पून्हा विस्कळित 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

मुंबईतील पावसाने रेल्वेसेवा पून्हा विस्कळित 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक-मुंबईतील मुसळधार पावसाने मध्य रेल्वेचे वेळापत्रक आज बुधवारी (ता.4) पून्हा कोलमडले. साधारण 12 रेल्वेगाड्याच्या प्रवासावर मोठा परिणाम झाला आहे.

अनेक गाड्यांच्या फेऱ्या रद्द झाल्या तर त्यातील अनेक गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहे. त्यात, पंचवटी उशीरा आहे. राज्यराणी व पॅसेजर रद्द झाली आहे. 

आज बुधवारी (ता.4) नाशिक जिल्ह्यातील चाकरमाण्यांची 12809 मुंबई मनमाड पंचवटी एक्‍सप्रेस सायंकाळी सव्वा सहा ऐवजी रात्री दहाला सुटली 
राज्यराणी,जालना, पॅसेजर रद्द 
11082 अप आणि 11081 डाउन गोरखपुर लोकमान्य टिळक टर्मिनल्स एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली. उद्या गुरुवारी (ता.5) ला सोडली जाणारी 17617 डाउन मुंबई नांदेड तपोवन एक्‍सप्रेस आणि 22101 डाउन मुंबई मनमाड राज्यरानी एक्‍सप्रेस आज आणि उद्याची 22102 डाउन मनमाड मुंबई राज्यरानी एक्‍सप्रेस रद्द करण्यात आली आहे. 51153 डाउन मुंबई भुसावळ पॅसेजर ट्रेन, 12071 डाउन दादर जालना जनशताब्दी एक्‍सप्रेस 12072 अप जालना दादर राज्यरानी एक्‍सप्रेस उद्या रद्द करण्यात आली आहे. 
 

loading image
go to top