रेल्वे मार्गावर दरड कोसळल्याने मातीचा ढिगारा,मार्गात अडथळा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जुलै 2019

इगतपुरी शहर- गेल्या चोवीस तासांपासुन इगतपुरीत मुसळधार पाऊस सुरु असल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी साठले असुन एकाच दिवसात 172 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. याचा फटका मध्य रेल्वेलाही बसला आहे. 
कसारा घाटातील हिवाळा ब्रीज जवळील बोगद्याबाहेर ऐन सकाळच्या सुमारास मातीचा मोठा ढिगारा थेट रेल्वे रुळावर पडल्याने मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहुन येणाऱ्या मेल एक्सप्रेस गाडयांची वाहतुक ठप्प झाली होती. 

या घटनेची माहीती रेल्वे प्रशासनाला समजताचं रेल्वे विभागाच्या आपत्ती विभागाने घटनास्थळी धाव घेऊन सदरचा मातीचा ढिगारा बाजुला केल्यानंतर वाहतुक सुरळीत करण्यात आली. या घटनेमुळे मध्य रेल्वेच्या गाड्या एक ते दिड तास ऊशिराने धावत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news railyway problem