वीज-वाऱ्यासह कोसळलेल्या मुसळधार पावसाने दाणादाण,वीज पडून एकाचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 5 October 2019

नाशिकः यंदाच्या मोसमात सुरवातीपासून हवामान विभागाच्या अंदाजाला समांतर प्रतिसाद देत आज कोसळलेल्या मुसळधार पावसाने शहर जिल्ह्यात दाणादाण उडवली. वीज कोसळून घोटीत एकाचा मृत्यु तर राशेगाव(ता.दिंडोरी) येथे शिवाजी इचाळे यांच्या शेतात वीज पडून एका बैलाचा मृत्यू झाला.काही ठिकाणी द्राक्षबागा भुईसपाट केल्या. धरणक्षेत्रातील पावसामुळे सायंकाळी धरणातून विसर्ग सुरु झाला. नवरात्रोत्सवासाठी यात्रोत्सव, रास गरबा आणि दुर्गापुजेच्या उत्साहासाठी घराबाहेर पडलेल्या भाविकांची मात्र चांगलीच दाणादाण उडवली. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rain