Video अजबच...चक्‍क निंबाच्या झाडातून दुध 

tree milk
tree milk

जळगाव : विवरे (ता.रावेर) येथे मदारशाह बाबा दरगाह आहे. या दर्गामध्ये असलेल्या निंबाच्या झाडातून चक्क दुध निघत असल्याचा प्रकार आज निदर्शनास पडला. हा अजब प्रकार पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. दिवसभर हा प्रकार सुरू होता. 


विवरे बु. येथील पठाण वाडीमध्ये मदारशाहा बाबाचा दरगाह आहे. दरवर्षी दरगाहचा उर्स (यात्रा) भरत असते. पुरातन काळातील म्हणजे 125 वर्षापूर्वीचा हा दरगाह असल्याचे जानकाराचे म्हणणे आहे. या दरगाहमध्येच निंबाचा झाड असून यातून आज सकाळपासूनच दुध निघत होत असल्याचे निदर्शनास पडले. सुरवातीला लिंबाच्या झाडाच्या फांदीतून पाणी पडत असल्याचे वाटत होते. परंतु, जवळ जावून पाहिले असता पांढऱ्या रंगाचे दूधासारखे द्रव निघत असल्याचे दिसून आले. 

मुलाच्या पडले निदर्शनास 
कडू निंबाच्या झाडाच्या वरील फांदीमधून दूध निघत असल्याचा प्रकार दरगाहसमोर बसलेल्या समीर नामक मुलाच्या लक्षात आले. तो समोर बसलेला असतांना झाडातुन पांढरे पाणी पडत असल्याने त्याने त्याकडे काही तरी पडत असेल अस समजुन दुर्लक्ष केले. बराच वेळ झाल्यानंतर देखील द्रव पडत असल्याने तेथून दुधाची धार लागल्याने त्याने वर जाउन पाहिले असता ते दुध असल्याचे लक्षात आले. यानंतर त्याने गावात हा प्रकार सांगितल्यानंतर अनेकांनी निंबाचे झाड पाहण्यासाठी धाव घेतली होती. 

द्रवात दुधासारखा गोडवा 
समीर नामक मुलाने पांढऱ्या रंगाचे द्रव कसले आहे? याची चाचपणी करत त्याने ते चाखून पाहिले असता साखरेसारखा गोडवा त्यात असल्याचे जाणवून आले. यानंतर याबाबत आजूबाजूच्या लोकांना ही बाब सांगताच दरगाहसमोर पाहणाऱ्याची एकच गर्दी उसळली. अनेकांनी हे द्रव चाखून पाहिले असता दुधात साखर असल्यासारखाच गोडवा जाणवून आला. विवरे गावातील नागरिकांनी एकच धावपड करून बघ्याची मोठी गर्दी केली होती. खरोखरच दुध पडत असल्याने ही बाब गावत वाऱ्यासारखी पसरली व मदार शाहा बाबा दरगाहाचा चमत्कार असल्याचे नागरिकांमध्ये आज दिवसभर चर्चा सुरू होती. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com