बाळंतीन पत्नी, मुलांसह सायकलवरुन १४०० किलो मीटरची वाटचाल 

pregnant
pregnant

रावेर : मे हिटच्या रखरखीत उन्हात घराबाहेर पडणे मुश्‍लीक आहे. कोरोनामुळे काम बंद पडल्याने मध्यप्रदेशातील रिवा येथील धाडसी तरुणाने महिनाभरापूर्वीच सिझर झालेल्या बाळंतीण पत्नी व दोन मुलासह सायकलवरून दीड हजार किलो मीटरचा मजल दर मजल प्रवास सुरू केला आहे. धड खायाला नाही...प्यायला नाही…भूकेने व्याकूळ पतीसोबत पोटाच्या गोळ्याला हदयाशी कवटाळून गाणे गुणगुणतांना हे जोडपे नजरेत पडले. आज मातृत्वदिनानिमित्त हे दृश्‍य पाहून या मातृत्वाला मनापासून सॅल्यूट ठोकला. 

कोरोनाच्या या जीवघेण्या वातावरणात प्रत्येकाला आपल्या घरी सुखरूप आणि शक्य तितक्या लवकर जायचे आहे. त्यासाठी अनेक जण हजार किलोमीटर अंतर पायी किंवा मिळेल त्या वाहनाने जाताना दिसतात. या जोडप्याने सुरतहुन मध्यप्रदेशातील रीवा पर्यंतचा सुमारे १४०० किलोमीटरचा प्रवास सुरू आहे. ही कोणत्याही सिनेमातील अथवा काल्पनिक कथा नाही. मध्य प्रदेशातील रीवा शहराजवळील एका खेड्यातील राज भवरसिंह हा २७ वर्षे वयाचा तरुण सुरत येथे एक कपडा मिलमध्ये मजुरी करतो. लॉकडाऊन पूर्वी तो त्याच्या पत्नीसह रिवा येथून सुरत येथे गेला होता. आता लॉकडाऊन मुळे कापड गिरणी बंद पडली आहे म्हणून, अखेर आपल्या घराकडे परतण्याचा निर्णय त्याने घेतला. रेल्वे आणि बस सेवा बंद असल्याने त्याने थेट सायकलची निवड केली. त्याची पत्नी सोनू सिंह (वय २६) हिचे सुमारे महिन्यापूर्वी लॉक डाऊनमध्येच सुरत येथे सिझर करून बाळंतपण झाले आहे. आपल्या शिवानी या अवघ्या एका महिन्याच्या मुलीला पत्नीने कवटाळले होते, शुभम सिंह (वय २) या मुलगा सायकलवर बसला होता. कॅरिवर जीवनावश्‍यक वस्तू तर राजभवर सायकल लोटल पत्नीसोबत गाणे गुणगुणीत वाटचाल करीत होता. चार दिवसांपूर्वी तो सुरत येथून निघाला असून काल (ता. ९) सायंकाळी तो रावेर येथे पोचला. अशिक्षित असल्यामुळे रेल्वे किंवा बसद्वारे ऑनलाइन तिकीट बुकिंग त्याला करता येत नाही म्हणून अखेर सायकलचा मार्ग निवडल्याचे त्याने सांगितले. 

रावेरला मुक्काम 
आपली कर्मकहाणी राज भवरसिंह यांनी येथील समाजसेवी कार्यकर्त्यांना सांगितली. त्यांनी या जोडप्याची जेवणाची व मुक्कामाची व्यवस्था केली. रविवारी सकाळी आपल्या हे जोडपे गावाकडेरवाना झाला. आठवडा भरात रीवा येथे पोहचणार असा अंदाज त्याने व्यक्त केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com