आर्थिक स्वावलंबनासह इतरांनाही दिला रोजगार! 

धनश्री बागूल
गुरुवार, 7 जून 2018

जळगाव : कुटुंबाची मदत असेल, तर महिलाही मागे राहत नाहीत, याची अनेक उदाहरणे आहेत. सहकारी बॅंकांच्या मदतीने फॅशन डिझायनिंगचा अभ्यासक्रम पूर्ण केला. स्वत:चे बुटिक सुरू करून नंतर ज्वेलरी मेकिंगचा व्यवसायही विकसित केला. त्यातून आर्थिक स्वावलंबन तर आलेच. शिवाय, इतरांनाही रोजगार मिळवून दिल्याची कांचन फिरके यांची किमया इतरांसाठी प्रेरणादायी ठरावी. 

नागपूर येथील माहेर असलेल्या कांचन किरण फिरके यांना सुरवातीपासूनच शिवणकामाची आवड होती. प्रथम वर्षाचे शिक्षण घेत असतानाच शहरातील किरण फिरके यांच्याशी विवाह झाला आणि कांचन जळगावात राहायला आल्या. सासरे व पती यांचा पुढील शिक्षणासाठी पाठिंबा मिळाल्याने त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. घरची परिस्थिती जेमतेम स्वरूपाची होती. मात्र, महिलांनीदेखील स्वावलंबी व्हावे, असा आग्रह घरातील मंडळींचा होता. 

पाठिंबा ठरला "टर्निंग पॉइंट' 
कुटुंबाचा आग्रह व पाठिंब्यामुळे पीपल्स बॅंकेतर्फे महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या फॅशन डिझायनिंग कोर्सला प्रवेश घेतला. या ठिकाणी मन लावून काम शिकताना कांचन यांच्यात आत्मविश्‍वास निर्माण झाला. सहा महिन्यांच्या कोर्सनंतर "फॅशन शो' आयोजित करण्यात आला होता. यात कांचन यांनी डिझाइन केलेल्या ड्रेसला पारितोषिके मिळाल्याने त्यांनी हाच व्यवसाय सुरू करायचा व स्वतःचे बुटिक सुरू करण्याचा निर्णय घेतला. 

शिवणकामातून उभारला व्यवसाय 
बुटिक सुरू करण्यासाठी लागणारा पैसा जवळ नसल्याने त्यांनी शिवणकामाचे क्‍लासेस सुरू केले. काही वर्षे महिलांना शिवणकामाचे धडे देत त्यातून पैसे जमवायला सुरवात केली. या कामासोबतच ज्वेलरी मेकिंगचेदेखील काम सुरू केले. 2004 ते 2018 पर्यंत वेगवेगळ्या कामांतून त्यांनी पैसा जमा करीत स्वतःचे बुटिक सुरू केले. स्वावलंबी होण्यासाठी मिळालेल्या संधीचे सोने करीत आज त्यांनी स्वप्न पूर्ण करीत स्वतःची ओळख निर्माण केली आहे. आज त्यांच्या बुटिकच्या माध्यमातून महिलांसह पुरुषांनाही रोजगार उपलब्ध झाला आहे. 

Web Title: marathi news rojgar bank kamcham firke