रोईंगपटू निखिल सोनवणेवर प्राणघातक हल्ला

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 15 मे 2019

नाशिकः येथील लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयाचा तसेच वॉटर एज स्पोर्टसक्लबचा रोईंगपटू निखिल भाऊसाहेब सोनवणे हा काल सायंकाळी सराव करून घरी परतत असतांना दबा धरून बसलेल्या काहींनी त्यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात निखील गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर गौरव अॅक्सिडेंटल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहे. 

   लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालयात तो एम.एम.प्रथम वर्षात शिकत आहे. रोज सकाळ व सायंकाळी बापुपुलाजवळ असलेल्या व वॉटर एज स्पोर्ट्स क्लबवर तो रोईंगचा सराव करण्यासाठी जात असतो.कालही सराव करून परतांना त्यांच्यावर हल्ला झाला. निखिलची 1७ ते १९  मे दरम्यान पुणे येथील नाशिक फाट्या जवळ असलेल्या आर्मी बोटींग क्लब येथे राज्यस्तरी रोईंगची स्पर्धा आहे. या स्पर्धेची त्याची तयारी सुरू होती. या हल्लामुळे तो या स्पर्धेला मुकणार आहे. त्यामुळे त्याचे एक वर्षाचे नुकसान होणार असून सरावात खंड पडणार आहे. निखिलने या अगोदर स्पर्धेत एक सुवर्णपदक, एक रौप्यपदक जिंकले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news rowing player attack