साक्रीमध्ये भाजपने केली विजबिलांची होळी 

धनंजय सोनवणे
Monday, 23 November 2020

विज बिल सर्वसामान्यांना भरणे शक्य नाही. महाविकास आघाडी सरकारने जनतेस 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले असताना शासनाच्यावतीने मात्र वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू आहे.

साक्री : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळातील वाढीव व अवाजवी वीज बिलाच्या प्रश्नी आज भाजपतर्फे विज बिलांची होळी करत आंदोलन करण्यात आले. तसेच या काळातील वाढीव व अवाजवी वीज बिलात सवलत मिळावी या मागणीचे निवेदन देखील तहसीलदारांना देण्यात आले.

आवश्य वाचा- गांजाची सीमेपलीकडून रिमोट शेती पोलिसांसाठी आव्हान   

लॉकडाऊनच्या काळात राज्यात महावितरण कंपनीने सर्वसामान्य जनतेचे घरगुती वीज बिलात मोठ्या प्रमाणात वाढ करून पाठवले आहे व हे विज बिल सर्वसामान्यांना भरणे शक्य नाही. महाविकास आघाडी सरकारने जनतेस 100 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले असताना शासनाच्यावतीने मात्र वीजबिलांची सक्तीने वसुली सुरू आहे. ही वसुली थांबवत शासनाने लॉकडाऊन काळात दिलेल्या वाढीव वीज बिलात सवलत द्यावी अशी मागणी या निवेदनातून भाजपकडून करण्यात आली आहे. तसेच ही मागणी मंजूर न झाल्यास पुढील काळात तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्याचा इशारा देखील या निवेदनातून देण्यात आला आहे. 

तत्पूर्वी पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्गावरच वीज बिलांची होळी करत शासनाचा व ऊर्जामंत्री यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र आजगे, साक्री मंडळ अध्यक्ष वेडू सोनवणे, पिंपळनेर मंडळ अध्यक्ष मोहन सूर्यवंशी, तालुका सरचिटणीस प्रदीप नांद्रे, जिल्हा परिषद सदस्य विजय ठाकरे, पंचायत समितीचे माजी गटनेते उत्पल नांद्रे, शहराध्यक्ष कल्याण भोसले, ज्येष्ठ नेते बापू गीते, रमेश सरक, संघटन सरचिटणीस दिनेश नवरे, उपाध्यक्ष राकेश दहिते, युवा मोर्चा अध्यक्ष शिवाजी देवरे, उपाध्यक्ष सचिन नांद्रे, माजी शहराध्यक्ष महेंद्र देसले, चिटणीस दिनेश सोनवणे, मुन्ना देवरे, दिपक वाघ, विनोदकुमार पगारिया, श्रीकांत कार्ले, विनोद पाटील, जगदीश चाळसे, मुकेश पाटील, कन्हैयालाल काळे, शुभम वाणी, किरण सोनवणे, विलास मोरे, सागर दहिते, खंडेराव कर्वे आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.
 
संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sakri BJP burnt increased electricity bills