esakal | राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना टपालाने पाठविल्या गोवऱ्या
sakal

बोलून बातमी शोधा

राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना टपालाने पाठविल्या गोवऱ्या

राष्ट्रवादी काँग्रेसने मोदींना टपालाने पाठविल्या गोवऱ्या

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


धुळे : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारतर्फे (Central Government) पेट्रोल, डिझेलसह घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे जगणे कठीण होत आहे. इंधन, गॅस सिलिंडर दरवाढीमुळे आर्थिक गणित कोलमडले आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Nationalist Congress) जिल्हा महिला व शहर आघाडीतर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टपाल कार्यालयातून गोवऱ्या पाठवत अनोखे आंदोलन करण्यात आले.

हेही वाचा: लस टोचल्यानंतर वृद्ध जागीच कोसळला..!‌


घरगुती सिलिंडरच्या किमती बुधवारी पुन्हा २५ रुपयांनी वाढल्या. १ जानेवारी ते १ सप्टेंबरदरम्यान सिलिंडरच्या किमतीत प्रत्येकी १९० रुपयांची वाढ झाली आहे. दरमहा सिलिंडरची दरवाढ हा देशात नवा उच्चांक गाठत आहे. या महिन्यात ग्राहकांना ९३६.५० रुपयांत सिलिंडर विकत घ्यावे लागत आहे. सरकारने दरमहा दर वाढवून एलपीजीवरील सबसिडी काढून घेतली. घरगुती सिलिंडरची किंमत सात वर्षांत दुप्पट झाली आहे. त्यामुळे गृहिणींची कसरत होत आहे, अशी संतप्त भावना व्यक्त करत साक्री येथे पंतप्रधान मोदी यांना पोस्टाद्वारे गोवऱ्या पाठवल्या.

हेही वाचा: कलयुगाच्या ‘श्रावणाने’ माता-पित्याला दाखविला मंदिराचा रस्ता


राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, जिल्हा कार्याध्यक्षा संजीवनी गांगुर्डे, साक्री तालुकाध्यक्षा रोहिणी कुवर, उपाध्यक्षा ललिता कुवर, सामजिक न्याय विभागाचे भय्या साळवे, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जयेश साळुंखे, सोशल मीडिया समन्वयक आदेश साळुंखे, विद्यार्थी शाखेचे साक्री शहराध्यक्ष पराग आहिराव, साक्री तालुका सचिव चिन्मय देवरे, तर धुळे शहरात मुख्य टपाल कार्यालयात महिला शहराध्यक्षा सरोज निकम, उषा पाटील, अ‍ॅड. तरुणा पाटील, छाया सोमवंशी, रेखा सूर्यवंशी, चेतना मोरे, वर्षा सूर्यवंशी, सुषमा महाले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष रणजित भोसले, दीपक देवरे, हाजी आसिफ बेग, इरफान पठाण, जुनेद शेख, ललित पाटील आदी उपस्थित होते.

loading image
go to top