नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधा होणार अधिक सक्षम

कोरोना काळात सर्व आरोग्य कर्मचारी चांगले काम करीत आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधा होणार अधिक सक्षम


नंदुरबार : अलीकडच्या काळात आरोग्य सुविधांचा (Health facilities) विकास वेगाने होत आहे. नागरिकांनी आधुनिक सुविधांचा उपयोग करून घ्यावा. आदिवासी विकास विभागामार्फत (Department of Tribal Development) आरोग्य सुविधांसाठी १७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. आकांक्षित जिल्हा म्हणून २५ कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले असल्याचे पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी (Minister Adv. K. C. Padvi) यांनी सांगितले.
( nandurbar district health facilities twenty five funds crore sanctioned)

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधा होणार अधिक सक्षम
ग्रामस्‍थांनी रात्र काढली जागून..ढगफूटीसारखा पाऊस

धडगाव तालुक्यातील तलई येथे उभारण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या (Health Center) नूतन इमारतीचे लोकार्पण राज्याचे आदिवासी विकास मंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाला जिल्‍हा परिषद अध्यक्षा सीमा वळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्‍हा परिषद समाज कल्याण सभापती रतन पाडवी, महिला व बालकल्याण सभापती निर्मला राऊत, माजी मंत्री पद्माकर वळवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन बोडके, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ. नारायण बावा, दिलीप नाईक, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. दिनेश वळवी आदी उपस्थित होते.

ग्रामीण भागात जनजागृतीची गरज

अॅड. पाडवी म्हणाले, अलीकडच्या काळात आरोग्य सुविधांचा विकास वेगाने होत आहे. नागरिकांनी अशा आधुनिक सुविधांचा उपयोग करून घ्यावा. आदिवासी विकास विभागामार्फत आरोग्य सुविधांसाठी १७२ कोटी रुपये देण्यात आले आहेत. आकांक्षित जिल्हा म्हणून २५ कोटी रुपये जिल्ह्याला देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारती राज्यात उत्तम अशा आहेत. ग्रामीण भागात आरोग्याविषयी जनजागृती करण्याची गरज आहे. विशेषतः कोरोना संदर्भात नागरिकांनी अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कोरोना काळात सर्व आरोग्य कर्मचारी चांगले काम करीत आहेत. नागरिकांनी योग्य खबरदारी घेऊन कोरोना नियंत्रणात त्यांना सहकार्य करावे. तिसरी लाट रोखण्यासाठी सर्वांनी मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे, असे त्यांनी सांगितले.

नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधा होणार अधिक सक्षम
वायरमनचा मारहाणीत मृत्‍यू; कारवाईबाबत नितीन राऊत यांचे व्‍टीट

२४ तास आरोग्य सुविधा मिळेल
जिल्‍हा परिषद अध्यक्षा वळवी म्हणाल्या, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीमुळे नागरिकांना २४ तास आरोग्य सुविधा मिळेल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंद्रातील सुविधांचा नागरिकांसाठी क्षमतेने उपयोग करावा. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामगिरीमुळे कोरोना संसर्ग नियंत्रण शक्य झाले. कोरोना लसीकरणासाठी जनजागृतीदेखील करण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाच्या प्रमाणात वाढ होत असून कमी लसीकरण झालेल्या गावात लसीकरण वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले.
( nandurbar district health facilities twenty five funds crore sanctioned)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com