Video "शान'चा थाटच न्यारा : प्यायला पाच लिटर दुध..काजू- बदामाचा खुराक 

रमेश पाटील
Friday, 20 December 2019

भारतातील अश्व चॅपियन "शान' नावाचा अश्व ज्याची किंमत तब्बल दहा कोटी रुपये इतकी आहे. हा आशिया खंडातील अलिशान नावाचा अश्वचा नातू व "शानदार' नावाच्या अश्वचा मुलगा आहे. 

सारंगखेडा : त्याला दररोज प्यायला पाच लिटर दुध... खुराक म्हणून काजू- बदाम, अंडे अन्‌ असे इतर बरेच काही... दिमतीला चार सेवक हे वर्णन तालमीतल्या कुण्या पहिलवानाची नाही.. तर सारंगखेडा अश्व बाजारात दाखल झालेल्या भारताचा चॅपीयन "शान'ची आहे. त्याची किंमत तब्बल दहा कोटी रुपये आहे. उद्या (ता. 21) अश्व रॅकवर प्रदर्शनात दाखविण्यात येणार आहे. 

लाखोची कार किंवा करोडोची घरांची किमंती पेक्षा जास्त मोल्यवान किंमत असलेली प्राण्यांची किंमत कधी ऐकली आहे का? तर असेच लक्‍झरीकार पेक्षाही मोठी किंमत असलेल्पा "शान' नावाचा घोड्याची किंमत आहे. आज पहाटे या अश्वाचे आगमन सारंगखेडा येथे झाले. शान अश्व मालकाचे स्वागत चेतक फेस्टिव्हल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल यांनी केले. 

"शान'ने मोडला विक्रम 
सारंगखेडा येथील यात्रोत्सवानिमित्त भरणाऱ्या अश्वबाजार हा देशाचा घोडे बाजाराचे नेतृत्व करतो. या अश्व बाजाराला चेतक फेस्टिव्हलची जोड मिळाली आहे. अश्व बाजारात तीन हजार अश्व आले आहेत. त्यापैकी पाचशेहून अधिक अश्वांची किमंत लाखोवर आहे. आतापर्यत अश्व बाजारात दोन कोटी रुपयांपर्यत किंमतीचा घोडा आलेला आहे. यंदा मात्र त्या किमतीचा विक्रम मोडून. भारतातील अश्व चॅपियन "शान' नावाचा अश्व ज्याची किंमत तब्बल दहा कोटी रुपये इतकी आहे. हा आशिया खंडातील अलिशान नावाचा अश्वचा नातू व "शानदार' नावाच्या अश्वचा मुलगा आहे. 

क्‍लिक करा > महिला पोलिसाशी घातली हुज्जत अन्‌ मशिनही हिसकावले 

महिन्याला पन्नास हजार खर्च 
पंजाब राज्यातून पटीयाला येथून आला आहे. याची उंची 6 फुट 6 इंची इतकी आहे. येथील चेतक फेस्टिव्हलच्या तापी काठावरील टेंट सिंटीच्या प्रागणांत व्हीआयपी कक्षात त्याची 50 बाय 50 च्या जागेवर राजेशाही थाटात राहण्यासाठी व्यवस्था केली आहे. त्यांच्या खाण्यापिण्यासह देखरेखीवर महिन्याला पन्नास हजार रुपये खर्च आहे. अश्व बाजारात आकर्षण ठरणार आहे. उद्या (ता. 21) "शान'ला अश्व प्रदर्शनात अश्व रॅकवर रपेटसाठी आणले जाणार आहे. त्याला पाहण्यासाठी गर्दी वाढत आहे. 

यात्रेतला सर्वात मोठा सेलिब्रेटी 
येथील यात्रोत्सवात आकर्षण असलेल्या अश्व बाजार व चेतक फेस्टिहलमध्ये दरवर्षी राजकीय, सिने अभिनेते, अभिनेत्री सेलिब्रेटी म्हणून येतात. यंदा या ठिकाणी "शान' नावाचा अश्वच सेलेब्रेटी आहे. अश्वाचा राजा असलेला व भारतातील चॅम्पियन ठरलेला हा अश्व पाहण्यासाठी अलोट गर्दी वाढली आहे. या अश्वाची बातमी सर्वप्रथम "सकाळ'ने प्रसिद्धी केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातून या अश्वाला पाहण्यासाठी गर्दी वाढली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda chetak festival SHAN horse