esakal | रमजानचे कडक रोजे..तरीही देवमाणसाची अविरत रुग्ण सेवा

बोलून बातमी शोधा

null

रमजानचे कडक रोजे..तरीही देवमाणसाची अविरत रुग्ण सेवा

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा : ग्रामीण भागात कोरोना संसर्गजन्य परिस्थितीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. कोरोना योध्दे जिवाची परवा न करता कर्तव्याशी एकनिष्ठ राहून रुणांची सेवा करत असल्याचे चित्र आहे. सारंगखेडा (ता. शहादा) येथील समय रुग्णालयाचे डॉ. फिरोज शहा हे कडक रोजे सुरू असतांनाही संकटच्या या काळात रुग्णांच्या मदतीला धावून जात आहेत. येथील श्री दत्त कोविड उपचार केंद्रात विनामूल्य सेवा देत आहेत. रमजानच्या पवित्र महिन्यात रुग्णांची सेवा करण्याचे मिळत असल्याने मोठे समाधान असल्याची भावना डॉ. शहा यांनी व्यक्त केली.

हेही वाचा: शेतकरी पुत्राचे हवामान 'ॲप' ठरणार बळीराजाला वरदान !

कोरोनाच्या काळात हे रमजान महिन्याचे हे दुसरे वर्ष आहे. प्रत्येक जण आपआपल्या घरी राहून उपासना करीत आहेत. डॉ. शहा यांच्यासारखे अनेकजण कर्तव्याशी प्रामाणिक राहून रुग्णसेवेसाठी धडपड करीत आहेत. डॉ. शहा यांचे स्वतःचे क्लिनिक मध्ये त्यांनी कोरोनाच्या या काळात कोरोना रुग्णांवर उपचार केले. वेळप्रसंगी रुग्णांच्या घरी जाऊन औषधेपचार करीत आहेत. गेल्या आठवडयात गावातील दत्त मंदिर सभागृहात लोकसहभागातून श्रीदत्त कोविड उपचार केंद्र सुरू करण्यात आले आहे. या केंद्रात विनामुल्य सेवा देत कोविड रुग्णांवर ते उपचार करीत आहेत. सेवा देत असतांना सध्याची परिस्थिती पाहून त्यांना गहिवरुन आले. परंतू स्वतःच्या मनाला खंबीर करून रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देणे गरजेचे असल्याने याची जबाबदारीही ते घेत आहेत. कधी घरी तर कधी आपत्कालीन परिस्थिती असल्यास कोविड उपचार केंद्रात रोजे सोडावे लागत आहेत.

हेही वाचा: विजयवाड्यातील ही आहेत सर्वोत्तम शॉपिंग ठिकाणे

मागील वर्षभरापासून मी कोविड रुग्णांवर उपचार करीत आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात रुग्णांची सेवा घडते. याचे मोठे समाधान वाटते. सध्याच्या काळात प्रत्येकाने आपल्या कुटुंबाची काळजी घेणे खुप गरजेचे आहे.

डॉ. फिरोज शहा, सारंगखेडा

संपादन- भूषण श्रीखंडे