esakal | यात्रेत आला नाही, पण मतदानाला नक्की या ! 
sakal

बोलून बातमी शोधा

यात्रेत आला नाही, पण मतदानाला नक्की या ! 

यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दत्त प्रभूंचा यात्रोत्सव रद्द झाल्याने बाहेर गावी गेलेल्या कुटुंबाला येता आले नाही.

यात्रेत आला नाही, पण मतदानाला नक्की या ! 

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा : कोरोनाने येथील यात्रोत्सव रद्द केला. त्यानिमित्ताने परिसरात नोकरी व्यवसायासाठी गेलेल्यांना गावी येता आले नाही. मात्र ग्रामपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने विनाखर्च ही संधी त्यांना प्राप्त झाली आहे. मतदानाच्या दिवशी मतदानाला नक्की या अशी विनवणी बाहेर गावी गेलेल्या मतदारांना इच्छुक उमेदवार करीत आहे. तसेच त्यांना आणण्याची व्यवस्था करण्यात येत असल्याची चर्चा आहे. 

आवश्य वाचा- नायगावच्या ग्रामपंचातीच्या निवडणूकीत उच्चशिक्षीत पती-पत्नी आमनेसामने

नोकरी व्यवसायानिमित्त परिसरातील अनेक कुटुंब व तरुण राज्यांच्या विविध शहरात स्थायिक झाले आहेत. मात्र गावाची नाळ तुटू नये याकरिता गावाच्या मतदार यादीत त्यांची नावे आजही समाविष्ट आहेत. अशा मतदारांची नावे मतदार यादीत शोधून त्यांना मतदानाचे आवाहन करण्यात येत आहे. ज्या प्रभागात अटीतटीची लढत आहे तेथे मात्र बाहेरगावी असलेल्या मतदारांना मतदानाच्या दिवशी आणण्यासाठी खास व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी विशेष कार्यकर्ते कामाला लावण्यात आले आहेत. यंदा कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून दत्त प्रभूंचा यात्रोत्सव रद्द झाल्याने बाहेर गावी गेलेल्या कुटुंबाला येता आले नाही. ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षापेक्षा व्यक्तिगत संबंध महत्त्वाचे ठरतात हा पूर्वानुभव असल्याने इच्छुक उमेदवार बाहेर गावी गेलेल्या मतदारांची विनवणी करीत आहे. यंदा यात्रा भरली नाही म्हणून यात्रेत आले नाही. पण मतदारानाच्या दिवशी नक्की या अशी विनवणी होत आहे. 

वाचा- नदीच्या पुलावर अचानक ट्रॉली उलटली; प्राण वाचले पण ? 
 

तापीकाठच्या या गावात निवडणुका 
तालुक्यातील बहुतांश ग्रामपंचायतींच्या निवडणुका या तापी नदीकाठच्या गावांच्या आहे. त्यात सारंगखेडा, टेंभा, कुऱ्हावद, कवठळतर्फे सारंगखेडा, बामखेडातर्फे सारंगखेडा, बामखेडातर्फे तऱ्हाड, शेल्टी, पुसनद, वरुळ, कानडी आदी गावांचा समावेश आहे. 
 

संपादन- भूषण श्रीखंडे

loading image