'उघड दार देवा आता उघड दार ! माकडांना ही प्रतिक्षा ?  

रमेश पाटील
Thursday, 3 September 2020

बंद धार्मिक स्थळे उघडावीत यासाठी राज्यात राजकीय पातळीवर आंदोलन सुरू झाले आहे. पंढरपूरचे मंदिर उघडावे यासाठी मोठे आंदोलन झाले.

सारंगखेडा  : कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी देशासह राज्यातील सर्व धार्मिकस्थळे गेल्या पाच महिन्यापासून बंद आहे. काही दिवसापूर्वी राज्यातील सर्व धर्मिक मंदिरे उघडावीत, देवदर्शन करता यावे यासाठी भाविकांसह राजकीय पक्षांकडून आंदोलन करण्यात आले. तर दुसरीकडे 'उघड दार देवा आता उघड दार देवा'चा घोष करीत सारंगखेडा येथील श्री एकमुखी दत्त व मारूती मंदिरावर दोन दिवसांपासून माकडे ठाण मांडून बसले आहेत. त्यांना जणू मंदिर उघडण्याची प्रतीक्षा आहे. ते मंदिराच्या कळसावर बसून वाट बघत आहे. 

देशात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने शासनाने लॉकडाऊन २२ मार्च पासून पुकारले. त्यानंतर केंद्र व राज्यशासनाकडून अॅनलाॅक अंतगर्त टप्प्याने उद्योग, व्यवसाय, मार्केट, दुकाने, वाहतुक सेवा चालू आदी निर्णय घेतला आहे. त्यामुळे बंद धार्मिक स्थळे उघडावीत यासाठी राज्यात राजकीय पातळीवर आंदोलन सुरू झाले आहे. पंढरपूरचे मंदिर उघडावे यासाठी मोठे आंदोलन झाले. भारतीय जनता पक्षाने घंटानाद करत मंदिर उघडण्याचे साकडे घातले. 30 सप्टेंबरपर्यंत राज्यातील कुठलीही मंदिर उघडणार नाही असे स्पष्ट करण्यात केले आहे.

 

मंदिरावर मांकडांची ठाण 

मंदिर उघडण्याच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सारंगखेड्याचे एकमुखी दत्त मंदिर व मारूती मंदिरावर दोन दिवसापासून चार माकड दाखल झाली आहेत. ही माकडे मंदिराच्या दारा भवती फिरत आहे. जणू मंदिराचे प्रवेशद्वार उघडण्याची प्रतीक्षा करताहेत असे जाणवते.

अन गावात चर्चा...

मंदिरात येणारे भाविकांकडून मिळणारा प्रसाद, फळ, पदार्थ माकडांना भाविक खाण्यास देतात अथवा माकडे हिसकून घेवून आपले पोट भरत असतात. परंतू कोरोनामूळे मंदिरे बंद असल्याने अनेक मंदिराबाहेरील माकडांना अन्न मिळत नसल्याने दिसत आहे. त्यातच सारंखेड्या गावातील दत्त मंदिरावर तसेच प्रवेशद्वारा भवती माकडे फिरून देवा दार उघड असेम म्हणून ते वाट पाहत असल्याची गावात चर्चा सुरू आहे. 

 

ही माकड दोन दिवसापासून येथे येत आहेत. त्यांना परिसरातून काही वस्तू खायला मिळतात. मात्र ते मंदिर उघडण्याची प्रतीक्षा करत असावेत अशा रीतीने वावरत आहेत.
- भिक्कन पाटील, विश्वस्त, दत्त मंदिर   

 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda monkey is also waiting for the religious site to open and temple around him