esakal | चोरलेल्या दुचाकीचा तब्बल साडेचारशे किलोमीटर प्रवास 
sakal

बोलून बातमी शोधा

bike robbery

शिरपूर ते शहादा रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करून येत होता. वडाळी (ता. शहादा) गावाजवळ दुचाकी बंद पडली त्याने गावाजवळील गॅरेज वर आणली. दुचाकी बंद पडली आहे

चोरलेल्या दुचाकीचा तब्बल साडेचारशे किलोमीटर प्रवास 

sakal_logo
By
रमेश पाटील

सारंगखेडा (नंदुरबार) : शिरपूरहून तो शहाद्याला येत होता. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वडाळीजवळ दुचाकी बंद पडली. दुरुस्तीसाठी तेथील गॅरेजला नेली. दुरुस्तीसाठी वेळ लागेल म्हणून, मी पुन्हा येतो सांगून गेला. तीन दिवस झाले दुचाकी चालक न आल्याने शेवटी गॅरेज मालकाने पोलिसांना माहिती दिली. मालकाचा शोध घेतला असता, गाडी चोरलेली होती. दुचाकी मालक पुण्याचा निघाला. 

शिरपूर ते शहादा रस्त्यावरून दुचाकीवरून प्रवास करून येत होता. वडाळी (ता. शहादा) गावाजवळ दुचाकी बंद पडली त्याने गावाजवळील गॅरेज वर आणली. दुचाकी बंद पडली आहे पाहून घ्या असे तेथील यंत्रज्ञला सांगितले. यंत्रज्ञने थोडया वेळात या पाहून घेईल. त्याने दुचाकी दुरुस्ती केली. मात्र तीन दिवस उजाडले तरी दुचाकीस्वार आला नाही, म्हणून पोलिसांना स्थानिक पोलिसपाटील गोसावी यांचामार्फत माहीती दिली. पोलिसांनी दुचाकीचा नंबरवरून मालकाचा शोध घेतला असता, मालक पुण्याचा निघाला. दुचाकी मालकाने सांगितले, की माझ्या दुचाकीची आठवड्यापूर्वी चोरी झाली आहे. त्यावरून ही दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. पुणे ते वडाळी (ता. शहादा) अंतर तब्बल साडेचारशे किलोमीटर आहे. एवढ्या अंतरावरून दुचाकी चोरून प्रवास केला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. तो कसा आला, कुठला असावा, इतक्या लांबून दुचाकी कशी आणली, असे अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. 
 
तीन दिवसांपूर्वी हिरो कंपनीची मोटारसायकल माझ्या गॅरेजवर आली. मोटारसायकल बंद पडली होती. त्याने दुरुस्ती करण्याचे सांगितले. त्याला थोड्या वेळात या करून ठेवतो, पण तीन दिवस झाले आला नाही. याबाबत पोलिसांना माहिती दिली. 
-पंकज पाटील, सर्वज्ञ मोटार गॅरेज, वडाळी 

संपादन ः राजेश सोनवणे