पीले पीले ओ मोरे राजा...म्हणत पुलावरून मारली उडी पण 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 10 May 2020

लॉकडाउनच्या काळात बंद असलेले वाईन शॉप गेल्या तीन दिवसापासून सुरु झाल्या आहेत . तळीरामांचा ४५ दिवसांचा कोरडा घसा ओला होऊ लागला आहे. मात्र यात अनेक घटना ही घडू लागल्या आहेत .

सारंगखेडा (नंदुरबार)  : पी ले पी ले ओ मोरे राजा .. करत त्याने तापी नदीवरील पुला वरून उडी मारली . पण देव तारी त्याला कोण मारी प्रमाणे तळीरामाला वाचवण्यासाठी तापीपात्रात मासेमारी करणाऱ्यांना यश आले . तळीरामाला तात्काळ दोंडाईचा रुग्णालय उपचारासाठी नेण्यात आले .
लॉकडाउनच्या काळात बंद असलेले वाईन शॉप गेल्या तीन दिवसापासून सुरु झाल्या आहेत . तळीरामांचा ४५ दिवसांचा कोरडा घसा ओला होऊ लागला आहे. मात्र यात अनेक घटना ही घडू लागल्या आहेत .आज सायकाळी ६ वाजता सारंगखेडा ते टाकरखेडा ( ता. शिंदखेडा ) दरम्यान असलेला तापी नदीवरील पुलावरून एक तळीरामाने पाण्यात उडी मारली .लॉक डाउनमुळे वाहनांची वर्दळ कमी असल्याने पुलावरून टाकरखेडा येथील युवक मोटार सायकल घेऊन येत होता . त्याला पाण्यात आवाज आला त्याने मोटार सायकल उभी करून पुलावरून खाली पाहीले तर कोणीतरी उडी मारली आहे . त्याने वरुन ओरडून खाली मासेमारी करणाऱ्यांना आवाज दिला कोणी तरी खाली उडी मारली आहे . मासेमारी करणाऱ्यांना लक्षात आले की कोणीतरी पाण्यात डुंबकी मारत आहे . तात्काळ पोहचून त्याला पाण्यातून काढून वाचविले . म्हणतात ना . देव तारी त्याला कोण मारी प्रमाणे . तळीराम वाचला पण कंबरेला जबर मार लागल्याने त्याला उचलुन दोंडाईचा खाजगी रुग्णालयात उपचारा साठी दाखल करण्यात आले . 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news sarangkheda wine drinking and tapi river brige jump

Tags
टॉपिकस
Topic Tags: