esakal | अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत 
sakal

बोलून बातमी शोधा

residentional photo

अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या अर्जासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुस्लीम, ख्रिश्‍चन, शीख, बौद्ध, पारशी,जैन या अल्पसंख्यांक समाजातील विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिक्षणासाठी केंद्र शासन पुरस्कृत शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येणार आहे. शैक्षणिक वर्ष 2019-20 साठी पात्र विद्यार्थ्यांना नवीन शिष्यवृत्ती व शिष्यवृत्तीचे नुतनीकरण करता येईल. अर्ज करण्यासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत असेल. 

केंद्र सरकारच्या या योजनेसंदर्भातील अधिक माहितीसाठी किंवा अर्ज सादर करण्यासाठी www.scholarships.gov.in या संकेतस्थळावर भेट द्यायची आहे. विद्यार्थ्यांनी निर्धारीत मुदतीत ऑनलाईन स्वरूपातील अर्ज सादर केल्यानंतर महाविद्यालयांनी प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज फॉरवर्ड करण्याची 15 नोव्हेंबरपर्यंत अंतिम मुदत आहे. पोस्ट मॅट्रिक अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीची सविस्तार माहिती, अर्ज करण्याची पद्धत, संकेतस्थळ, तसेच इतर माहिती संकेतस्थळावर उपलब्ध आहे. पात्र विद्यार्थ्यांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे. 

loading image
go to top