esakal |  जागा बदलली अन घात झाला, क्लब मालकावर अजून ही कारवाई नाही
sakal

बोलून बातमी शोधा

 जागा बदलली अन घात झाला, क्लब मालकावर अजून ही कारवाई नाही

येणाऱ्या महागड्या गाड्यांच्या माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कदम यांना मिळाली व त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाळत ठेवीत त्यांनी मोठी धाडसी कारवाई केली.  

 जागा बदलली अन घात झाला, क्लब मालकावर अजून ही कारवाई नाही

sakal_logo
By
प्रा.डी.सी.पाटील

शहादा : पोलिसांनी शहादा गावात बुधवारी जुगार अड्यावर   यडीमुळे जुगार अड्डा उध्वस्त झाला. त्यातून 'जागा बदलली अन घात झाला, जुना अड्डाच बरा होता' म्हणण्याची वेळ त्या क्लब मालकावर आली. कमाई वाढविण्याच्या लोभापाई मोठ्या जागी गेला अन कर्तव्यदक्ष पोलिसांच्या नजरे आला असेच या घटनेवर दिसून येते. एवढा मोठा अड्डा राजरोसपणे सुरू असल्याच्या घटनेने शहाद्याच्या डीबी (स्थानिक गुन्हा अन्वेषण) पथकाच्या कार्य पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान कारवाईत लाखो रूपयांसह 43 व्यक्तींना पोलिसांनी अटक करीत गुन्हा नोंदविला. परंतु क्लब मालकावर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. अन्य जुगार अड्यांवरही पोलिस अशीच कारवाई करतील का असा प्रश्न विचारला जात आहे. मुळावर घाव बसला तरच अवैध धंदे चालकांवर जरब बसेल पण तसे होतांना दिसत नाही.

शहादा येथील भूषण रेसिडेन्सीच्या मागील इमारतीत जुगार खेळला जात असल्याचा माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत कदम यांना मिळाली. त्यांनी अत्यंत गोपनीयपणे धडक कारवाई करीत महागड्या गाड्यांसह 67 लाख रुपयांचा ऐवज व 43 व्यक्तींना अटक करण्याचे धारिष्ट्य दाखवले. कारवाई गोपनीय ठेवण्यासाठी सर्वच कर्मचाऱ्यांनी सहकार्य करणे ही बाब पोलिस विभागासाठी अभिनंदनीय ठरली आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई होती. यात मध्यप्रदेश, गुजरातसह धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील व्यक्तींचा समावेश होता. 

जागा बदली आणि कारवाई झाली

कारवाई झालेला अड्डा यापूर्वी शिरूड चौफुलीवरील एका वसाहतीत सुरू होता. तेथेही पोलिसांनी कारवाई केली आहे. काही दिवसानंतर तो पुन्हा जोमाने सुरू झाला. क्लबची ख्याती सर्व दूर पसरल्याने श्रीमंत ग्राहकांची वर्दळ वाढली. त्यातून लहान ऐवजी मोठ्या जागी गेलो तर उत्पन्न वाढेल या लोभापायी क्लब मालकाने लकी ठरलेल्या त्या इमारतीतील व्यवसाय आठ दिवसांपूर्वीच भाड्याच्या या इमारतीत स्थालांतरीत केला. तेथे येणाऱ्या महागड्या गाड्यांच्या माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी श्री. कदम यांना मिळाली व त्यांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. पाळत ठेवीत त्यांनी मोठी धाडसी कारवाई केली.  

संपादन- भूषण श्रीखंडे