शिक्षक दाम्पत्याने स्वखर्चातून चालती फिरती डिजिटल शाळेची केली निर्मिती

शिक्षक दाम्पत्याने स्वखर्चातून चालती फिरती डिजिटल शाळेची केली निर्मिती

शहादा  : आजच्या परिस्थितीत कोविड -19 या जागतिक महामारी च्या प्रादुर्भाव मुळे देशभरात शाळा बंद आहेत. शिक्षण घेण्यासाठी अनंत अडथळे पार करून कुठे ऑनलाइन तर कुठे ऑफलाईन करत शिक्षण सुरु आहे. परंतु प्रकाशा (ता.शहादा) येथील जिल्हा परिषद कन्या शाळेतील शिक्षक रवींद्र पाटील व प्रियंका पाटील या दाम्पत्याने स्वतः च्या संकल्पनेतून स्व मालकीचा चार चाकी गाडीला शिक्षणाचा रथ बनवून शिक्षण व शाळा आपल्या दारी राबवत आहेत.या शिक्षक दाम्पत्याने चालती फिरती डिजिटल शाळेची निर्मिती करून लहानग्यांना शिक्षणाचे बाळकडू देत एक आदर्श निर्माण केला आहे. 

प्रकाशा (ता. शहादा)हे तालुक्यातील मोठे गांव आहे. गावाचा विस्तार चार ते पाच कि.मी आहे. यात खणगा हाटी,भवानी हाटी, बुधवार बाजार चौक,शनि मंदिर चौक , मुजरा हाटी , नाग बर्डी हाटी ,पिप्पर हट्टी यासारख्या हाट्टीमधून कन्या शाळेत विद्यार्थिनींचे प्रवेश आहेत. तेथे शाळाबंद असताना तसेच कोरोना चा प्रादुर्भाव बघता प्रत्यक्ष विद्यार्थ्यांपर्यंत अभ्यास पोचवण्यासाठी ऑनलाईन शिक्षण हा येथील ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांना सोईस्कर पर्याय ठरू शकला नाही. किंबहुना त्यांची एवढी परिणामकारकतादिसून आली नाही , म्हणून येथील शिक्षकांनी आपल्या स्वतःच्या कारमध्ये एलईडी अँड्रॉइड टीव्ही लावून सोबत इन्व्हर्टर व माइक स्पीकर बसवून या शिक्षण रथाच्या माध्यमातून गावातील विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष डिजिटल शिक्षण देण्यास मदत झाली. 

यासाठी येथील शिक्षकांनी त्या त्या भागातील विद्यार्थ्यांचे 1 ते 4 वयाच्या एकत्रित गट करून सामाजिक अंतराने तसेच कोविड -19 अंतर्गत सर्व शासकीय नियमांचे पालन करुन सकाळी दहा ते एक या वेळेत आठवड्यातील वारानुसार शिक्षण देण्याचे कार्य करण्यात येत आहे. 


यासाठी शिक्षकांनी स्वखर्चाने पदरमोड करुन सर्व विद्यार्थिनींना स्वाध्याय पुस्तिका वाटप केल्या आहेत. त्या सोडवुन घेणे व तपासण्याची ही कामे केले जात आहेत. त्याच बरोबर या आजाराचा काळात घ्यावयाची काळजी , मास्क वापरणे, वारंवार हात धुणे तसेच माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबतीतही जनजागृती करण्यास मदत होत आहे. तसेच सोबत मोफत मास्क वाटप करण्यात येत आहेत . 

विद्यार्थी जरी शाळेत येऊ शकत नाही परंतु शिक्षक विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ शकतात या संकल्पनेतून रविंद्र पाटील, मुख्याध्यापक जि. प. कन्या शाळा प्रकाशा यांनी शिक्षण रथाच्या माध्यमातून शाळा आपल्या दारी हा उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा एक प्रयत्न केला आहे. सदर कार्यासाठी कन्या शाळेचे शिक्षक भाऊराव कोकणी, नूतन पाटील, प्रियंका पाटील व अनुराधा गव्हाणी प्रयत्न करीत आहेत तसेच केंद्रप्रमुख आर. आर. धनगर तसेच जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था नंदुरबार यांचे मार्गदर्शन लाभले व शाळा व्यवस्थापन समिती ग्रामपंचायत प्रकाशा गावातील सामाजिक कार्यकर्ते सरपंच, उपसरपंच विशेष सहकार्य नेहमी लाभत आहे.

 
संपादन- भूषण श्रीखंडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com