esakal | टायर फुटताच तीन वेळा कार झाली पलटी
sakal

बोलून बातमी शोधा

accident

धावत्‍या गाडीचे टायर फुटल्‍याने गाडीने अचानक पलटी घेतली. तीन- चार वेळा पलटी होवून गाडी रस्‍त्‍याच्या कडेला पडली. हा अपघात पाहिल्‍यानंतर बघ्‍यांचे होश उडाले होते.

टायर फुटताच तीन वेळा कार झाली पलटी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

शहादा (नंदुरबार) : सातपुडा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील यांच्या वाहनाचे टायर फुटल्याने शहादा प्रकाशा रस्त्यावर शहरानजीक असलेल्या हॉटेल राजरंग समोर दुपारी एक वाजे दरम्यान अपघात घडला. त्यात ते सुदैवाने बचावले असून त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली आहे.

आज दुपारी ज्येष्ठ नेते दीपक पाटील वाहन क्रमांक (एम. एच.३९ एबी ,९०१३) या गाडीने लांबोळा (ता. शहादा) येथे जात असताना शहरानजीक हॉटेल राजरंग समोर अचानक गाडीचा टायर फुटल्याने अपघात घडला. त्यात गाडी रस्त्याच्या कडेला कोसळली. अपघातानंतर त्यांना त्वरित नागरिकांनी शहरातील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यात त्यांच्या हातात किरकोळ दुखापत झाली असून आता ते विद्याविहार येथील निवासस्थानी आहेत. कार्यकर्त्यांनी घरी भेटावयास येऊ नये व निवासस्थानी गर्दी करू नये असे त्यांचे भाऊ प्राचार्य मकरंद पाटील यांनी कळविले आहे.

अपघात पाहून सारे अवाक
धावत्‍या गाडीचे टायर फुटल्‍याने गाडीने अचानक पलटी घेतली. तीन- चार वेळा पलटी होवून गाडी रस्‍त्‍याच्या कडेला पडली. हा अपघात पाहिल्‍यानंतर बघ्‍यांचे होश उडाले होते. अपघातातून कोणी बचावणार नसेल. असेच वाटत होते. मात्र सुदैवाने दीपक पाटील यांच्या हाताला खरचटले आहे.