कोणी रूग्णवाहिका देतं का रूग्णवाहिका...

दिनानाथ पाटील
Saturday, 11 July 2020

दोन ग्रामीण तर दहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्या प्रत्येकाला ऐक रुग्णवाहिका दे.्यात आली आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या बधता स्वतंत्र रुग्णवाहिका अससे गरजेचे आहे. परंतु कुठेही कोरोनाबाधित सापडल्यास रुग्णवाहिकेचा शोध ध्यावा लागतो.

शहादा : येथील मोहिदास्थित शासकीय क्वारंटाईन सेंटरसाठी स्वतंत्र रुग्णवाहिका नाही. त्यामुळे वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांसह बाधित रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. तालुक्यातील आरोग्य केंद्रांच्या रूग्ण वाहिका वेळेवर उपलब्ध होत नाहीत. 

आवर्जून वाचा - जुगाड टेक्‍नॉलॉजी...मोटर सायकलची केली तिफण 

तालुक्यात दोन ग्रामीण तर दहा प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत. त्या प्रत्येकाला ऐक रुग्णवाहिका दे.्यात आली आहे. तालुक्यात कोरोनाबाधितांची वाढती संख्या बधता स्वतंत्र रुग्णवाहिका अससे गरजेचे आहे. परंतु कुठेही कोरोनाबाधित सापडल्यास रुग्णवाहिकेचा शोध ध्यावा लागतो. कोरोनाबाधितांना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका नाही. येथील क्वारंटाईन सेंटरला तालूक्यातील ग्रामीण रूग्णालयासह बारा प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका रोटेशन पद्धतीने उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रूग्ण आढळले की ,त्या रूग्णाला नंदुरबार येथे नेण्यासह त्याच्या नजीकच्या व्यक्तींना क्वारंटाईन करून क्वारंटाईन कक्षापर्यंत नेण्यासाठी वैद्यकीय पथकाची तारांबळ उडते. वाहकाला निरोप दिल्यानंतर वाहिका येईपर्यंतची वेळ प्रशासनासाठी नेहमीच जीवघेणी ठरत आहे. त्यात एकच वाहिका आली तर सर्व पॉझिटिव्ह रूग्णांना नाइलाजाने एकाच गाडीत पाठवावे लागते. 

रुग्णवाहिका चालकांकडून वेळकाढूपणा 
९ जुलैस सायंकाळी उशिराने शहरातील दोन व तोरखेडा येथील एक, असा तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या तिघा महिलांना जिल्हा रूग्णालयात नेण्यासाठी म्हसावद, मंदाणे व सारंगखेडा आरोग्य केंद्रातील 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेसाठी फोन केले. दहा मिनिटात पोहोचतो, अर्ध्या तासात पोहोचतो, अशी उत्तरे मिळाली. मात्र दोन ते अडीच तास रुग्णवाहिकेची वाट पाहिली. शेवटी रात्री उशिराने रुग्णवाहिका उपलब्ध झाली. बाधित रुग्णांना तेव्हा जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आले.

संपादन : राजेश सोनवणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada covid center no ambulance avalable