लग्नाची तयारी अन्‌ वर गायब... 

सकाळ वृत्तसेवा
Friday, 29 November 2019

लग्नाची तयारी झाली. तारीख जसजशी जवळ येत होती. तसतशी वधू पित्याची चिंता वाढत होती. घरात लग्न असल्याने सर्वत्र आनंदीआनंद होता. मात्र लग्नाला काही दिवस उरले. हळदीचा दिवस आला, 28 नोव्हेंबर लग्नाचा दिवस उजाडला. वर पक्षाची मंडळी येतील याची प्रतीक्षा करत वधूकडील मंडळी बसली होती. अखेर लग्नाचा मुहूर्तही गेला; तरीही ना वर आला ना वरात आली.

नंदुरबार ः लग्न निश्‍चित झाले, तारीख ठरली, वधू पक्षाकडून लग्नाची तयारी झाली. लग्नाचा दिवस आला अन्‌ लग्नाची घटीकाही समिप आली; तरीही वर व वराकडील मंडळी लग्नमंडपात पोहचलीच नाही. हा प्रकार शहादा येथील ब्रह्मसृष्टी कॉलनीत घडला. वर पक्षाकडून वधू व तिच्या कुटुंबीयांची फसवणूक करणाऱ्या अकोला येथील वरासह पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हेही पहा > बेल फॉर वॉटर पोचतेय जळगावपर्यंत 

शहादा येथील ब्रम्हसृष्टी कॉलनीतील सेवानिवृत्त असलेल्या पालकाने आपल्या मुलीचे लग्न करण्याचे निश्‍चित केले. वर शोध मोहिम करत अकोला येथील गीतानगरस्थित आकाश रमेश गुन्नलवार याच्या रूपाने मुलीस योग्य वर मिळाला. वर- वधू या दोन्ही पक्षांकडून रिवाजानुसार पाहण्याचा कार्यक्रम पुर्ण झाला. दोन्ही पक्षाकडील मंडळींनी 6 जुलै 2019 ला विवाहसोहळ्याची तारीख निश्‍चित करण्यात आली. त्यानुसार 28 नोव्हेंबर ही लग्नाची तारीखही निश्‍चित करत मुलीकडे लग्न करण्याचे निश्‍चित झाले. 

नक्‍की वाचा > त्याचा रूबाब दराराच न्यारा 

ना वर आला ना निरोप 
लग्न म्हटले म्हणजे लग्नघरातील धावपळ वाढते. खरेदीचा धामधुडाका सुरू झाला. लग्नाची तयारी झाली. तारीख जसजशी जवळ येत होती. तसतशी वधू पित्याची चिंता वाढत होती. घरात लग्न असल्याने सर्वत्र आनंदीआनंद होता. मात्र लग्नाला काही दिवस उरले. हळदीचा दिवस आला, 28 नोव्हेंबर लग्नाचा दिवस उजाडला. वर पक्षाची मंडळी येतील याची प्रतीक्षा करत वधूकडील मंडळी बसली होती. अखेर लग्नाचा मुहूर्तही गेला; तरीही ना वर आला ना वरात आली. या प्रकारात झालेल्या फसवणुकीमुळे वधू पित्याने थेट पोलिसात धाव घेतली. घडलेल्या घटनेबाबत फिर्याद शहादा पोलिसात दिली. त्या फिर्यादीवरून अकोला येथील वर आकाश रमेश गुन्नलवार याच्यासह अजय गुलाबशेठ कानडे, रूपाली अजय कानडे (रा. चोपडा), राजेंद्र देवराम गुन्नलवार, चंद्रकांत रमेश गुन्नलवार (रा. अकोला) या पाच जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada marrage date police