त्याचा रूबाब,दराराच न्यारा.. म्हणूनच कोल्हापुरच्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर

live
live

नाशिकः राज्याच्या पोलिस दलात संवेदशील भागात असलेल्या श्‍वानांमध्ये नाशिकचे श्‍वान मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहेत. चंद्रपुर, गडचिरोली या नक्षलवादी भागासह नांदेड, लातूर, सोलापुर येथेही श्‍वानांनी आपल्या लौकीकास साजेसी कामगिरी बजावली आहे. त्याच्या याच अतुलनीय कामगिरीच्या जबाबदारीची दखल घेत आता कोल्हापुर शहराच्या बॉम्ब शोध पथकातही नाशिकच्या श्‍वानाचा प्रवेश झाला असून तो जणू सदस्यच बनला आहे. 

नाशिकच्या फेंटम कॅनाईनचे नितिन बिऱ्हाडे, अमोल नाडे व विशाल जाधव यांनी कोल्हापुर शहर बॉम्ब पथकाचे प्रमुख अधिकारी दिलिप पाटील यांच्याकडे हा बेल्जीयम मालिनीयोस जातीचा श्‍वान गुरुवारी सुपूर्द केला. कामा करण्यास व नविन शिकण्यास हा श्‍वान नेहमीच उत्सुक असतो. अत्यंत चपळ असल्याने त्यात ताशी 30 मैल धावण्याची क्षमता आहे. जबडा अत्यंत शक्तीशाली असल्याने तो सावज सहज पकडू शकतो. दात अत्यंत तिक्ष्ण असल्याने पकडलेले लक्ष्य निसटणे शक्‍यच नसते. 

बालपणीच शोधकार्याचे प्राथमिक धडे 
अमेरिकेतील सुरक्षा दलात बेल्जीयम मालिनीयोस जातीच्या श्‍वांनाना मोठे स्थान आहे. त्यात राष्ट्राध्यक्षांची सुरक्षा असो की आंतराष्ट्रीय गुन्ह्यांचा तपास असो, यासाठी बेल्जीयम मालिनीयोस जातीच्या कुत्र्यांचा वापर केला जातो. सैन्यदल, कायदा व सुव्यवस्था या ठिकाणी या श्‍वानांना मोठे स्थान आहे.

सुपर सुपर डॉग असा लौकीक

अतिसंवेदशील घाणेंद्रिय असलेल्या व "सुपर सुपर डॉग' म्हणुन लौकिक मिळवलेल्या बेल्जीयम मालिनीयोस जातीच्या कुत्र्यांच्या पिलांची पैदास नाशिकमधील "फेंटम कॅनाईन' मध्ये केली जाते. त्यांना बालपणीच सुरक्षेचे व शोधकार्याचे प्राथमिक धडे दिले जातात. त्यात आदेश पाळणे, नविन शिकणे, कार्यतत्परता यासाठी प्रसिध्द आहे. फेंटम कॅनाईनचे सद्या सोलापुर बॉम्ब शोध पथकात मीरा, गडचिरोली येथे 10 नर व 6 मादी, चंद्रपुर येथे 2 नर व एक मादी बॉम्ब शोध पथकात कार्यरत आहेत. याशिवाय भारतीय लष्कर, बीएसएफ, वनविभाग, पोलिसदल, महत्वाचे विमानतळ, रेल्वेस्थानक, बसडेपो या ठिकाणी कार्यरत असलेले ल्याब्रेडोर, जर्मन शेफर्ड, डॉबरम्यान या जातीचे श्‍वान कार्यरत आहेत. 

चपळ,बुध्दीमान अन् बळकटही...
मानव व पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी प्रथम या श्‍वानाचा वापर बेल्जीयमने केला गेला, विशेषतः मेंढ्यांची राखण करण्साठी "बेल्जीयम मालिनीयोस'चा वापर केला गेला. अतिशय बुध्दीमान, चपळ व बळकट असलेल्या श्‍वानाच पैदास 1920मध्ये करण्यात आली, नंतर फ्रान्स स्वित्झर्लंड, नेदरलॅंड, कॅनडा आणि अमेरिकेत निर्यात केली गेली. या देशांमध्ये बॉम्बशोध, बचाव कार्य, सशस्त्र सेनेत या श्‍वानांचा यशस्वी वापर झाल्याने अमेरिकन केनेल क्‍लबने मान्यता दिलेल्या 155 जातीमध्ये बेल्जीयम मालिनीयोस हा 90 व्या क्रमांकावर आहे.  
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com