महिनाभरात लाखाहून अधिक टन उसाचे गाळप 

कमलेश पटेल
Thursday, 10 December 2020

यंदा पाऊस चांगला झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. 

शहादा : यंदा सातपुडा साखर कारखान्याने गाळप हंगाम सुरू केल्यानंतर ३३ दिवसांत एक लाख १७ हजार टन उसाचे गाळप झाले असून, त्यापासून ८७ हजार ३७५ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. प्रतिदिन चार हजार टन उसाचे गाळप सुरू असून, कारखाना पूर्ण क्षमतेने सुरू असल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक पी. आर. पाटील यांनी दिली. 
दरम्यान, कारखाना परिसरात उसाने भरलेल्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागलेल्या आहेत. 

आवश्य वाचा- दररोज दर्शन देणारा बिबट्या अखेर अडकला; पाहण्यासाठी नागरिकांची एकच गर्दी 

पुरुषोत्तमनगर (ता. शहादा) येथील श्री सातपुडा सहकारी साखर कारखाना ५ नोव्हेंबरपासून सुरू झाला. शेतकरी, कामगार, अधिकाऱ्यांच्या मेहनतीने व संचालकांच्या मार्गदर्शनाने पूर्ण क्षमतेने कारखाना सुरू आहे. ऊसही मोठ्या प्रमाणात उपलब्ध असल्याने परिसरात समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा विश्वास कारखान्यावर पुन्हा वृद्धिंगत होत असल्याचे चित्र दिसत आहे. गत वर्षी व यंदा पाऊस चांगला झाल्याने उसाची लागवड मोठ्या प्रमाणात झाली आहे. या वर्षी सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट कारखान्याने ठेवले आहे. 

वाचा- दिलासादायक; नंदूरबार जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना २५ कोटींची मदत 

कारखान्याने या वर्षी उसाला प्रतिटन दोन हजार ३६५ रुपये भाव दिला आहे. ऊस वाहतुकीसाठी चारशे ट्रॅक्टरसह बैलगाड्या सुरू आहेत. कारखाना सुरू झाल्याने रोजगारालाही चालना मिळाली आहे. कोरोना महामारीत कारखाना प्रशासन कामगार व ऊसतोड कामगारांची आरोग्याबाबत पूर्ण खबरदारी घेत आहे.  
 

संपादन- भूषण श्रीखंडे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada one million tonnes of sugarcane crushed in a month