पपईला मिळणार इतक्‍या रूपयांचा भाव

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 25 January 2020

पपई उत्पादक संघर्ष समितीच्या संघटित लढ्याला व शेतकऱ्यांच्या पाठिंब्यामुळे हा पपई दर मिळू शकला. यामुळे शनिवारपासून पपई उत्पादक शेतकऱ्यांनी पपईची तोड सुरू करण्यास हरकत नाही. 
- भगवान पाटील, जयनगर, पपई उत्पादक संघर्ष समिती. 

शहादा : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या पपई दराबाबतचा तिढा तब्बल चार तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर आज सुटला. व्यापारी, पपई उत्पादक शेतकरी संघर्ष समिती यांच्यात कृषी उत्पन्न बाजार समितीने समन्वय साधत ११ रुपये ७५ पैशांप्रमाणे भाव आजच्या बैठकीत ठरला. पुढील बैठक होईपर्यंत याच दराने पपई खरेदी करण्याचे व्यापाऱ्यांनी चर्चेअंती मान्य केले. दरम्यान उद्यापासून या दराने पपई देण्यास हरकत नसल्याचे शेतकऱ्यांनी मान्य झाले. 

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात पपईच्या तिढा सोडवण्यासाठी आज दुपारी चारला सुरू झालेली बैठक तब्बल चार तास चालली. सभापती सुनील पाटील, उपसभापती रवींद्र रावल, सचिव संजय चौधरी, शेतकरी संघर्ष समितीचे भगवान पाटील ,उमेश पाटील, दीपक पाटील, डॉ. ओंकार पाटील ,विश्वनाथ पाटील, जितेंद्र पाटील, जगदीश पाटील, हिरालाल माळी ,राजेंद्र पाटील, अनिल पाटील, मानक चौधरी आदी तर व्यापारी प्रतिनिधी म्हणून शेख हाजी नाजिम हाजी सरताज, हाजी इक्बाल, राहुल भाई राजस्थानवाले, प्रकाशभाई राजस्थानवाले, हाजी अहमद हाजी नाजीम आदींसह व्यापारी उपस्थित होते. 

क्‍लिक करा - "जलयुक्‍त'मध्ये निधीचेच "सिंचन'

उत्तर प्रदेशामध्ये सध्या असणारे भाव आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणारा दर यात मोठी तफावत असल्याने तब्बल चार तास चर्चा चालली. यात अखेर समेट घडवून पुढील बैठक होईपर्यंत ११ रुपये ७५ पैसे दराने पपई तोड करण्यास व्यापाऱ्यांनी सहमती दर्शविल्याने उद्यापासून शेतकऱ्यांनी या दराने पपई तोडून द्यावी असे बैठकीत ठरले. 

सकाळी स्वतंत्र बैठक 
तत्पूर्वी सकाळी अकराला बायपास रोडवरील रामदेव बाबा मंदिरात पपई उत्पादकांची स्वतंत्र बैठक झाली त्यात संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. नंतर शेतकर्‍यांमध्ये आपसात चर्चा झाल्यानंतर तहसील कार्यालयात दाखल झाले. तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांच्या कार्यालयात पपई उत्पादक संघर्ष समितीचे पदाधिकारी शेतकरी व्यापारी व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांच्यात चर्चा झाली. परंतू तोडगा निघत नसल्याने तहसीलदारांनी आज पुन्हा तात्काळ चारला बैठक घेण्याचे श्री. चौधरी यांना सांगितले. त्यानंतर तिसरी बैठक बाजार समितीच्या सभागृहात झाली, अखेर चार तासाच्या प्रदीर्घ चर्चेनंतर तोडगा निघाला. 
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada papaya rate market final