कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा. देशमुखांचा अपघाती मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मे 2019

शहादा ः लोणखेडा बायपास रोडवरील विष्णूनारायण मंदीराजवळ अपघात होवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहेत. 

शहादा ः लोणखेडा बायपास रोडवरील विष्णूनारायण मंदीराजवळ अपघात होवून कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. अनिल देशमुख यांचा जागीच मृत्यू झाला. तर गाडीतील अन्य चौघे किरकोळ जखमी झाले आहेत. 
कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा अनिल देशमुख हे खाजगी वाहन मारुती वॅग्नार (क्र. एम. एच. 18, एजे 5466) ने कुटुंबीयांसमवेत सकाळी पानसेमल (म. प्र.) येथे नातेवाईकांना पाहण्यासाठी जात असताना लोणखेडा खेतीया रस्त्यावरील श्री विष्णू नारायण मंदीराजवळ त्यांच्या गाडीला अपघात झाला. रस्त्याच्या उजव्या बाजूकडून तीन- चार महिला रस्ता ओलांडत असल्याचे गाडी चालक कुलदीप बटेसिंग रावल यांनी गाडीचा ब्रेक दाबला. गाडी जागीच थांबल्याने गाडीने तीन ते चार पलटी मारून रस्त्यालगतच्या ब्रासमध्ये पडले. त्यामुळे गाडीत पुढे बसलेले अनिल देशमुख यांच्या डोक्‍याला मार बसल्याने नाका तोंडातून रक्त वाहत होते. त्यांना लागलीच नागरीकानी रूग्णालयात उपचारासाठी आणले असता, तेथे डॉक्‍टरांनी त्यांना मृत घोषीत केले. मृताचे नातेवाइक चार जण जखमी झाले आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news shahada pro deshmukh accident daith