
शहराबाहेर सुमारे दोन ते तीन किलोमीटरवर आहे. त्यामुळे तहसीलशी संबंधित कामासाठी प्रत्यक्ष जावे लागते. त्यात दिव्यांग, वृद्धांचे हाल होतात.
शहादा :पतसंस्थेत अडकलेल्या पैशांबाबत प्रश्न सोडवण्यासाठी बुधवारी दुपारी साडेचारला तहसील कार्यालयात आलेल्या दिव्यांग व्यक्तीला खुद्द तहसीलदारांनी दाखवलेला माणुसकी धर्म साऱ्याच कर्मचाऱ्यांना अवाक करणारा ठरला. आपले पद, दर्जा या साऱ्या गोष्टींना तिलांजली देऊन माणुसकी म्हणून मदतीसाठी धावून येणारे पहिलेच अधिकारी संबंधित व्यक्तीने पाहिले.
आवश्य वाचा- फडणवीसांनी केली खडसेंच्या पक्षांतराच्या ‘डॅमेज कंट्रोल’ची चाचपणी
अन् त्यालाही गहिवरून आले. संबंधित व्यक्तीची परिस्थिती पाहून त्याला बसण्यासाठी आपल्या बाजूलाच असलेली खुर्ची दिली. त्यावर बसवून त्या व्यक्तीची सर्व कहाणी ऐकून लागलीच प्रश्न मार्गी लावला. पुन्हा आपल्या कार्यालयातील कर्मचाऱ्याचा मदतीने संबंधित व्यक्तीला वाहनापर्यंत स्वतः पोचविवले.
तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या दिव्यांगांसाठी तत्काळ स्वखर्चाने तहसील कार्यालयात व्हीलचेअर उपलब्ध करून दिली. यातून साहेबातल्या माणुसकीचे दर्शन घडले. येथील तहसील कार्यालय शहराबाहेर सुमारे दोन ते तीन किलोमीटरवर आहे. त्यामुळे तहसीलशी संबंधित कामासाठी प्रत्यक्ष जावे लागते. त्यात दिव्यांग, वृद्धांचे हाल होतात. अधिकारी सहकार्य करणारे असतील, तर सर्वच कामे सोपे होते. सुदैवाने नवीन तहसील कार्यालयात रॅम्प आहे. फक्त व्हीलचेअर नव्हती. तहसीलदारांनी तो प्रश्नही मार्गी लावला.
कार्यालयात कामासाठी येणारे सर्व व्यक्ती आमच्यासाठी समान आहेत. त्या दिव्यांग बंधूची परिस्थिती पाहून वाईट वाटले. यासाठी कार्यालयात कामासाठी येणाऱ्या दिव्यांग बंधूंसाठी स्वखर्चातून एक व्हीलचेअर खरेदी केली.
-डॉ. मिलिंद कुलकर्णी, तहसीलदार, शहादा
संपादन- भूषण श्रीखंडे नेर